ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरल्याचा अभिमान : PM नरेंद्र मोदी

अयोध्या : वृत्तसंस्था – आज जय श्रीराम हा जयघोष केवळ याच ठिकाणी नाही तर संपूर्ण जगात याचा जयघोष होत आहे. या ठिकाणी मला आमंत्रण देण्यात आलं हे माझं भाग्य. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी येणं हे स्वाभाविक होतं. भारत आज शरयू तिरी एक स्वर्णिम अध्याय रचत आहे. आज संपूर्ण भारत राममय आणि मन दिपमय झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. एवढ्या वर्षाची प्रतिक्षा आज पूर्ण झाली, असेही ते म्हणले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला त्यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली. यानंतर त्यांनी या ठिकाणी वृक्षारोपणही केलं. सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे अयोध्येत स्वागत केले.

राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी
आता रामलल्लासाठी एक भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभुमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आजचा दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे. प्रभू श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. हे ठिकाणी प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. खुप काही बदलेल. राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like