मंदिरासोबत इतिहासाचीही पुनरावृत्ती : PM मोदी

अयोध्या : वृत्तसंस्था – कोरोनामुळे हा कार्यक्रम काही मर्यादांच पालन करून होत आहे. प्रभू श्रीराम यांच्या कार्यक्रमासाठी मार्यादांचं पालन करून झालं पाहिजे तसे देशातील नागरिकांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, श्रीराम मंदिर आपल्या संस्कृतीचं आधुनिक प्रतिक बनले. आपल्या शाश्वत आस्तेचं हे प्रतिक असेल. हे मंदिर कोट्यावधी लोकांच्या सामूहिक शक्तीचं प्रतिक ही बनेल. हे येणाऱ्या पिढ्यांना साधना आणि संकल्पाची प्रेरणा देत राहील.

मंदिर उभं राहिल्याने अयोध्येची केवळ भव्यता वाढणार नाही तर अर्थतंत्रावरही परिणाम होईल. संपूर्ण जगभरातून इथे लोक प्रभू राम आणि माता सीतेच्या दर्शनासाठी येतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, सत्य अहिंसा, बलिदानाला राम मंदिर हे न्यायप्रिय भारताची देण आहे. राम मंदिर निर्माणाची प्रक्रिया वर्तमानाला भूतकाळाशी, स्व ला संस्काराशी, नर ला नारायणाशी जोडण्याचं प्रतिक आहे.प्रभू श्रीरामाचं मंदिर म्हणजे एकजुटीचं प्रतीक आहे.

श्रीराम गेल्या अनेक वर्षापासून भारताचे स्तंभ बनले आहेत. श्रीरामाचं नाव असलेल्या शिळा देशातील अनेक भागांतून आल्या त्या एक ऊर्जा निर्माण करत आहेत. भारताची अध्यात्मिकता हा जगासाठी प्रेरणेचा विषय असल्याचे, पंतप्रधानांनी सांगितले. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. श्रीरामांना खारीसहीत वानर, केवटच्या वनवासी बंधुंची सोबत मिळाली होती. ज्या पद्धतीनं दलीत, मागासवर्गीय, आदिवासी अशा प्रत्येक वर्गानं स्वतंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींना साथ दिली होती. त्याच पद्धतीने सर्वांच्या सहकार्याने राम मंदिराचं निर्माण होतंय, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.