Ram Mandir Bhumi Pujan : जाणून घ्या इतर मंदिरांपेक्षा किती वेगळे आहे राम मंदिराचे भूमीपूजन

अयोध्या : वृत्त संस्था – अयोध्यामध्ये आज राम मंदिराचे भूमीपूजन होत आहे. संपूर्ण देश आज या ऐतिहासिक पूजनाचा साक्षीदार होणार आहे. हे भूमीपूजन सामान्य मंदिरांपेक्षा खूप वेगळे आहे. श्रीरामांचा जन्म सुद्धा अभिजीत मुहूर्तावर झाला होता. यासाठी भूमीपूजन सुद्धा यानुसारच ठेवले आहे. जाणून घेवूयात कसे असेल राम मंदिराचे भूमीपूजन…

अभिजीत मुहूर्तावर पूजन
राममंदिर भूमीपूजनाची वेळ अभिजीत मुहूर्तावर ठेवण्यात आली आहे. यानुसार पंतप्रधान मोदी दुपारी 12.15 वाजता पवित्र अभिजीत मुहूर्तावर कोनशिला ठेवतील. यामध्ये नऊ वीटांचा वापर करण्यात येईल. ज्या चार दिशांना, चार कोपर्‍यात आणि देवता स्थानांवर असतील.

दुसरीकडे ज्योतिषांच्या दृष्टीने अभिजीत मुहूर्त खुप शुभ मानला जातो. अभिजीत मुहूर्तावर भूमीपूजनाचे कारण श्रीरामांचा जन्म आहे. कारण असे मानले जाते की, श्रीरामांचा जन्म सुद्धा अभिजीत मुहूर्तावर झाला होता. यानुसार भूमीपूजन ठेवण्यात आले आहे.

देशभरात पूजन केलेल्या शिलांचा वापर
श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे ट्रस्टी परमानंद महाराज यांनी म्हटले की, देशभरात ज्या-ज्या ठिकाणी शिलापूजन झाले आहे, त्या सर्व शिलांचा वापर राम मंदिराच्या बांधकामात केले जाईल. एवढेच नव्हे, तर अयोध्याच्या कारसेवक पुरममध्ये कार्यशाळेत जे दगडांवर कोरीव काम केले आहे ते दगड सुद्धा मंदिराच्या बांधकामात वापरले जाणार आहेत.

या दगडांशिवाय अयोध्याच्या कारसेवक पुरममध्ये ज्या हजारोच्या संख्येने वीटा आहेत, ज्या देशाच्या विविध भागातून भक्तांनी श्रद्धेपोटी आणल्या आहेत, त्यांचाही वापर करण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like