नाशिक पोलिसांनी साधू-पुरोहितांना बजावली नोटीस, महाआरती करण्यास मनाई

पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येत काही वेळात राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. या भूमिपूजनच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मंदिरे खुली करा अशी मागणी करणार्‍या साधू, संत, महंत, पुरोहित यांना पोलिसांकडून कलम 149 ची नोटीस बजावण्यात आली आहे.

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील मंदिरे खुली करा अशी मागणी हिंदूत्वावादी संघटनांनी केली होती. पण, कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्ह्याधिकार्‍यांनी परवानगी देण्यास नकार दिला होता. खबरदारी म्हणून साधू, संत, महंत, पुरोहित यांना नोटीस बजावण्यात आली आहे. शहरातील रामकुंड, गोदा घाट येथील राम स्तंभ अभिषेक, पूजा अर्चा, गोदानदी पूजन अर्थात महाआरती करण्यास मनाई करण्यात आली आहे. रामकुंडामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा केल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा देत मध्यरात्रीच नाशिक पोलिसांनी शहरातील सर्व साधू, महंत, पुरोहित यांना नोटीस बजावली आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी महाआरती करणारच असा पवित्रा सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला होता. पण, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पोलिसांनी सर्व मंहत आणि पुरोहितांना गर्दी न करण्याची विनंती केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like