अमेरिकेच्या राजधानीत घुमला ’प्रभू श्रीराम’चा जयघोष

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – आज प्रभू श्रीरामाच्या मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात येणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी सजली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे व भूमिपूजन सोहळ्याचे ठिकाण सॅनिटाइझ करण्यात आले आहे. भारतातच नाही तर बाहेरही या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आनंद साजरा केला जात आहे. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डिसीमध्ये भक्तांनी एकत्र येत प्रभू श्रीरामचा जयघोष केला.

राम मंदिरासाठी होण्यार्‍या भूमिपूजनाचा उत्साह आणि आनंद त्यांनाही गगनात मावेनासा झाला होता. केवळ भारतातच नाही तर अमेरिकेतही याचा आनंद आणि उत्साह साजरा केला जात आहे. भूमिपूजनाआधी अयोध्यानगरीच नाही तर देशभरात विविध ठिकाणी भक्तांकडून प्रभू श्रीरामचा जयघोष, भजन, जागर करण्यात आला आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कार्यालयाबाहेर रांगोळीने सजवण्यात आले आहे. देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. गाझियाबादमध्ये भक्तांकडून भजन आणि जय श्रीराम असे स्वर ओठी उमटत आहेत. भक्तीमय वातावरणात अयोध्या नगरी न्हाऊन निघाली आहे. भूमिपूजन सोहळा आणि पंतप्रधान मोदी आज काय संबोधन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.