Ram Mandir Land Scam | राममंदिर जमीन घोटाळ्याच्या वादात अयोध्येतील साधूंची उडी; म्हणाले – ‘घोटाळा झालाच कसा यावर PM मोदींनी उत्तर दयावे’

अयोध्या : वृत्तसंस्था –  राममंदिर जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार (Ram Mandir Land Scam) झाल्याचे आपच्या खासदारांनी उघडकीस आणल्यानांतर त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकार, भाजप (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह (Rashtriya Swayamsevak Sangh) निगडीत संस्थांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता या वादात अयोध्येतील साधूंनीही उडी मारली आहे. त्यांनी थेट PM नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि शिवाय भाजपचे वरिष्ठ नेतेही आहेत. त्यामुळे त्यानी हा घोटाळा कसा झाला याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली आहे. Ram Mandir Land Scam | ayodhya sadhu asked pm narendra modi over ayodhya land deals

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

आगामी काही महिन्यांत उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
भाजपसह अन्य पक्षांनी यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.
राममंदिराचा (Ram Mandir) निकाल लागल्याने निश्चितच या निवडणुकीत हा मुद्दा मते मिळवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. भाजप आणि रा.स्व.संघासाठी गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराचा
मुद्दा महत्त्वाचा होता. दरम्यान, राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर राम मंदिर (Ram Mandir) ट्रस्टकडून झालेल्या जमीन खरेदी व्यवहारात भ्रष्टचार (Ram Mandir Land Scam) उघडकीस आले आहे. त्यामुळे अयोध्येतील साधूंनी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर स्पष्टीकरण द्यायला हवे,
अशी मागणी केली आहे.

निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास म्हणाले की, काही जमिनी काही आठवडे किंवा तासापूर्वी खरेदी केल्या असतील.
त्यानंतर त्या जादा किमतीला राम मंदिर ट्रस्टला विकल्या गेल्या आहेत.
याचे लाभार्थी भाजपशी संबंधित आहेत. अशा घटना समोर आल्या आहेत.
नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते आहेत त्यामुळे त्यांनी हा घोटाळा का झाला,
याचे उत्तर द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, अयोध्येतील माजी आमदार आणि सपा सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले
तेज नारायण पांडे उर्फ पवन पांडे यांनी प्रथम जमीन व्यवहारावर प्रश्न उपस्थित केला होता.
जमीन खरेदीचा व्यवहार २ कोटीमध्ये झाला त्याच दिवशी साडेअठरा कोटी एग्रीमेंट झाले.
या व्यवहारात ट्रस्टी अनिल मिश्रा आणि महापौर ऋषिकेश उपाध्याय साक्षीदार आहेत.
१८ मार्च २०२१ रोजी १० मिनिटापूर्वी जी जमीन २ कोटीत खरेदी केली त्याच जमिनीवर १० मिनिटांत साडेअठरा कोटींचा करार कसा झाला? तसेच १० मिनिटांत असं काय झालं
की २ कोटींची जमीन साडेअठरा कोटींची झाली?, असा सवालहि पांडे यांनी उपस्थित केला होता.

Web Title : Ram Mandir Land Scam | ayodhya sadhu asked pm narendra modi over ayodhya land deals

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Reserve Bank of India। बँकावर ‘अंकुश’ ठेवणार्‍या राजकारण्यांना धक्का; नगरसेवक, आमदार अन् खासदारांबाबत RBI चा मोठा निर्णय