Ram Mandir News | बोगस वेबसाईट बनवून राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रूपये, 5 जणांचा पर्दाफाश

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – राम मंदिर (ram mandir) जमीन व्यवहारात भ्रष्टाचार (ram mandir land scam) झाल्याचा मुद्दा चर्चेत सध्या गाजत आहे. त्यातच आता राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट fake website तयार करून राम भक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक 5 arrest केली आहे. नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

आशिष गुप्ता (वय २१), नवीन कुमार सिंग (वय २६), सुमित कुमार (वय २२), अमित झा (वय २४) आणि सुरज गुप्ता (वय २२ सर्व.रा. न्यू अशोक नगर पूर्व दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राममंदिरासाठी देशातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात येत आहे. त्याचाच फायदा घेत आरोपींनी राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने वेबसाईट सुरू केली. देणगी देण्यासाठी या वेब साईटवर बँकेचा खाते क्रमांक देण्यात आलेला होता. त्याचबरोबर इतरही माहिती होती. या बोगस वेब साईटच्या माध्यमातून राम मंदिराच्या नावाखाली देणगीदारांकडून लाखो रुपये उकळले. हि माहिती खबऱ्यांकडून समजताच नोएडा सायबर पोलीस ठाणे आणि लखनौ सायबर क्राईम मुख्यालयातील पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्यापैकी तीन जण अमेठी जिल्ह्यातील रहिवाशी आहेत, तर दोघे बिहारमधील सीतामढी येथील आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून पाच मोबाईल, एक लॅपटॉप आणि आधार कार्डच्या ५० प्रतीसह अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे.

हे देखील वाचा

Pune News | अल्पवयीन मुलाला ऊसाच्या दांडक्याने केली मारहाण; पोटात रक्तस्त्राव झाल्याने मुलगा झाला अत्यवस्थ, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

TCS | भारती एयरटेल आणि TCS ची 5G नेटवर्क बनवण्यासाठी पार्टनरशिप

Chandrakant Patil । चंद्रकांतदादांचा राऊतांना टोला; म्हणाले – ‘शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ram Mandir News | ram janmabhoomi trust ayodhya illegal website Ram temple construction scams lakhs of rupees from donors

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update