पूरग्रस्तांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ‘आवाहन’, आरोग्य समस्येवर ‘प्रभावी’ उपायांचा सरकारचा प्रयत्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हजेरी लावली होती. आरोग्याचा प्रश्न ही भारतापुढील एक प्रमुख समस्या असून विविध आरोग्य सेवांद्वारे त्याला तोंड देण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

या वेळी राष्ट्रपती कोविंद यांनी देशापुढील आरोग्यविषयक बाबींचा ऊहापोह केला. ते म्हणाले की, देशापुढे संसर्गजन्य व्याधी, नवनवे आजार व उन्नत होणाऱ्या व्याधींचे आव्हान समाजासमोर उभे ठाकले आहे. आरोग्य सेवेची कमतरता, कुपोषण व दुर्लक्षित व्याधींमुळे या अडचणी उद्भवतात. त्यावर मात करण्यासाठी आयुष्मान भारत व अन्य उपक्रम सरकारतर्फे राबविले जात आहेत.

राष्ट्रपतींनी महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या ग्रामदत्तक, ग्रामीण आरोग्य विमा, सामुदायिक आरोग्य या उपक्रमांची प्रशंसा केली. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांप्रति संवेदना व्यक्त केली. नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता रामनाथ कोविंद, आयोजक संस्थेचे अध्यक्ष धीरुभाई मेहता उपस्थित होते.

आरोग्यविषयक वृत्त –