राम सेतुच्या सेटवर कोरोनाचा कहर ! 45 ज्युनियर आर्टिस्ट्स पॉझिटिव्ह, अक्षयच्या चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता अक्षय कुमारने रविवारी आपण कोरोनाने पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. आता बातमी आहे की, त्याचा चित्रपट राम सेतुच्या सेटवर 45 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत. सर्व सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. इतक्या मोठ्या संख्येने सेटचे लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळणे चित्रपटासाठी समस्या बनले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोमवार 5 एप्रिलला 100 लोक राम सेतुच्या सेटवर आपले काम सुरू करणार होते. हे सर्व मड आयलँडमध्ये चित्रपटाचा सेट जॉईन करणार होते. परंतु सेट जॉईन करण्यापूर्वी कोरोना टेस्ट रिपोर्टमध्ये 45 ज्यूनियर आर्टिस्ट पॉझिटिव्ह सापडले, ज्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूसीई) चे जनरल सेक्रेटरी अशोक दुबे यांनी म्हटले – राम सेतुची टीम संपूर्ण काळजी घेत आहे. दुर्दैवाने ज्यूनियर आर्टिस्ट असोसिएशनचे 45 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. ते सर्वजण क्वारंटाइनमध्ये आहेत.

चित्रपटाचे शुटींग 13-14 दिवसासाठी पुढे ढकलले
अक्षयसह 45 ज्यूनियर आर्टिस्ट कोविड-19 पॉझिटिव्ह झाल्यानंतर आता सोमवारी होणारे चित्रपटाचे शुटींग पुढे ढकलले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या संदर्भाने म्हटले आहे की, आता चित्रपटाचे शुटींग 13-14 दिवसानंतर सुरू होईल. अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह आढळण्यापूर्वी मड आयलँडवर राम सेतुचे शुटींग करत होता. त्याच्यात टेस्टपूर्वी कोणतीही लक्षणे नव्हती आणि तो एकदम फिट होता.

कोरोनापासून वाचण्यासाठी आतापर्यंत लाखो रूपये खर्च
सूत्रांनी सांगितले की, सावधगिरी म्हणून शुटींगच्या काही दिवस अगोदर कोरोनाची टेस्ट केली जाते. जे कोरोना टेस्टमध्ये पास होत नाहीत त्यांना आयसोलेटेड ठेवले जाते. परंतु राम सेतुचे निर्माते त्यांना पैसे सुद्धा देतात. फिल्मचे युनिट इतके सतर्क आहे की, जर एखाद्या व्यक्तीची तब्येत ठिक नसेल तर त्यास युनिटने केलेल्या व्यवस्थेत ठेवले जाते. राम सेतुच्या शुटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच पीपीई किट, टेस्ट, आयसोलेशन इत्यादीवर लाखो रूपये खर्च करण्यात आला आहे.