Ram Shinde | अनिल देशमुख यांच्या ठावठिकाण्याबाबत भाजपचे माजी मंत्री राम शिंदेंचा खळबळजनक दावा; म्हणाले…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Ram Shinde | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील 100 कोटींच्या आरोपावरुन गेली अनेक महिन्यापासुन राजकीय वातावरण चांगलंच ढवळुन निघालं आहे. देशमुखांची याप्रकरणी सीबीआय नंतर आता ED कडुन चौकशी सुरु आहे. दरम्यान ईडीने पाच वेळा समन्स बजावुन देखील अनिल देशमुख हजर राहीले नाहीत. यावरून भाजप आता देशमुख यांच्यावर निशाणा साधत आहे. कोरोनाच्या काळात सामान्य लोकांची गर्दी पांगविण्यासाठी अनिल देशमुख पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. आता त्यांना त्याच लाठ्यांची भीती वाटत असल्याने ते अटक टाळत असावेत,’ असा टोला भाजपचे नेते आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी लगावला. त्यावेळी ते नगर येथे माध्यामांशी बोलत होते.

राम शिंदे (Ram Shinde) बोलताना म्हणाले की, ‘राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे.
केंद्रीय मंत्र्याला तात्काळ अटक केली जाते. गुन्हा घडला महाडमध्ये, दाखल केला नाशिकमध्ये आणि स्थानबद्ध केले रत्नागिरीत.
केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीने अटक केली जाते आणि आता माजी गृहमंत्र्याविरुद्ध लूक आऊटची नोटीस जारी होऊनही माजी गृहमंत्री सापडत नाही, हे पटत नाही.
खरे तर त्यांनी स्वत: होऊन तपास यंत्रणेसमोर यायला हवे.

पाच नोटीसा जाऊनही ते हजर होत नाहीत. त्यांना कधी ना कधी ED पुढे जावेच लागेल आणि जी
प्रक्रिया आहे ती पूर्ण करावीच लागेल. प्रथमच हे पाहण्यात येत आहे की, वकिलाला आणि अधिकाऱ्यालाच अटक झाली आणि आरोपी फरार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: हजर झाले पाहिजे.
नाहीच झाले तर पोलिसांना माहिती असेल की ते कोठे आहेत. असं राम शिंदे (Ram Shinde) यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, ‘ कोरोनाच्या काळात सामान्य लोकांची गर्दी पांगविण्यासाठी याच गृहमंत्र्यांनी पोलिसांना लाठ्यांना तेल लावून ठेवण्यास सांगितले होते. कदाचित आता त्यांना याच लाठ्यांची भीती वाटत असावी.
केंद्रीय मंत्र्याला अटक होते आणि माजी गृहमंत्री सापडत नाही, असा या राज्याचा कारभार आहे.
त्यामुळे जनतेचा यांच्यावर विश्वास राहिला नाही, असा घणाघात देखील राम शिंदे (Ram Shinde) यांनी केला आहे.

 

Web Title : Ram Shinde | former minister ram shinde taunts anil deshmukh over lookout notice

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Murder in Pimpri | प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून चाकूने केले सपासप वार

Maharashtra Police | गृहमंत्र्यांच्या नावे 10 लाखांची खंडणी; 5 पोलिसांवर ‘FIR’ दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Kirit Somaiya | ‘दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार’ – किरीट सोमय्या