भाजपाला मोठा धक्का ! राम मंदिर, 370 मुद्दे झारखंडमध्ये झाले फेल

रांची : वृत्त संस्था – राज्यातील सरकारच्या कामगिरीवर मते मागण्याऐवजी समाजाला दुही माजविणाऱ्या मुद्द्यावर भर देऊन हिंदुत्वाचे राजकारण करण्याचा भाजपाला गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न आहे. महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्ये या भाजपाच्या धोरणाला मोठा धक्का बसला आहे. झारखंडमध्ये झामुमो काँग्रेस आघाडीने बहुमतासाठी लागणाऱ्या ४१ जागांपेक्षा अधिक ठिकाणी आघाडी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी झारखंडमधील निवडणुक प्रचारात चार महिन्यात राम मंदिर बांधणार, काश्मीरमधील ३७० कलम रद्द करणे, ट्रिपल तलाक या मुद्द्यांवर भर दिला होता. झारखंडमधील भाजपा सरकारने पाच वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा राष्ट्रीय मुद्दे आणि मोदी यांच्या नावावर निवडणुक लढविली. त्याला झारखंडमध्ये मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाचे अनेक सहकारी पक्ष भाजपाला सोडून स्वतंत्रपणे निवडणुक लढवत होते. भाजपाबरोबर या पक्षांची मोठी घसरण झाली आहे.

या उलट काँग्रेसने झामुमोसहर राजद यांना बरोबर घेतले. तसेच आदिवासींच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात असल्याच्या प्रचारावर भर दिला होता. राम मंदिर, ३७० कलमापेक्षा तो अधिक वरचढ ठरला आहे. नव्या वर्षात दिल्ली आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. झारखंडमधील वारे पहाता या दोन्ही ठिकाणी भाजपापुढे मोठे आव्हान असणार आहे.

झारखंडमधील तरुणांनी देशातील घडामोडींपेक्षा राज्यातील महत्वाच्या प्रश्नांना मतदान करताना महत्व दिल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच निवडणुकीच्या मुडमध्ये असलेला भाजपा आपल्या धोरणात बदल करणार का याकडे पहावे लागणार आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/