राम मंदिर : मुख्य पुजारी संत्येंद्र दास यांनी भाजपला सुनावले

आयोध्या : वृत्तसंस्था

राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक जिंकली आणि आता मंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याचे कारण देत मंदिर उभारणीबाबत चालढकल करत आहेत. जर राम मंदिर उभारणीचा निर्णय न्यायालयाकडूनच होणार असेल तर मग आम्ही भाजपची साथ कशासाठी द्यायची, असा सवाल करत राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सत्ताधारी भाजपला सुनावले आहे. आता भाजपकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत, मात्र राम मंदिराच्या आंदोलनामध्ये शिवसेनेने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती, त्यामुळे आताही केवळ त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असेही दास म्हणाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3fa2d9c8-ce9b-11e8-b6f3-117e4a943067′]

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधी अयोध्येतील तयारीची पाहणी करण्यासाठी संजय राऊत यांनी अयोध्येला भेट देऊन सत्येंद्र दास यांची भेट घेतली. यावेळी सत्येंद्र दास बोलत होते. दास म्हणाले, अजूनही आयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाबाबत निर्णय झालेला नाही. दुसऱ्यांदा राममंदिराच्या निर्माणाचा मुद्दा उपस्थित करून भाजप सत्तेत आली. मात्र, दोन्ही वेळेस त्यांना त्याचा विसर पडला. आता आम्हाला शिवसेनेकडूनच अपेक्षा आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, जर भाजपने रामलल्लांना वनवासात ठेवले, तर जनता २०१९ मध्ये भाजपाला वनवासात पाठवेल. तीन तलाक आणि एससी, एसटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारने अध्यादेश काढले आहेत तर आता राम मंदिर निर्माणासाठी अध्यादेश का काढत नाही? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला.

[amazon_link asins=’B07G7YLG1C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’49729980-ce9b-11e8-8a04-7bbb87e303a9′]

उद्धव ठाकरे हे दसऱ्यानंतर अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासंदर्भात दसरामेळाव्यात उद्धव ठाकरे बोलणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे या दौऱ्यात राम मंदिर मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता असून यामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवसेना सध्या प्रत्येक मुद्द्यावरून भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी थेट नरेंद्र मोदी यांच्यावरही शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. आता आयोध्येच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख काय बोलणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संत तुकाराम महाराजांची सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात बदनामी