Ram temple scam | आरोप करणाऱ्यांनो पावती दाखवा अन् देणगी परत घेऊन जा – साक्षी महाराज

उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था –  अयोध्येतील (Ayodhya) श्री राम मंदिर (Shri Ram Temple) निर्मितीसाठीच्या जमीन व्यवहारामध्ये घोटाळा (Ram temple scam) झाल्याचा आरोप अनेक नेते करत आहेत. यावरून सर्वत्र वाद उफाळला जात आहे. या आरोपावरून भाजपच्या खासदाराने एक मोठं वक्तव्य केलं आहे. राम मंदिर निर्मितीसाठीच्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी देणगी दिल्याची पावती दाखवावी आणि दिलेली देणगी परत घेऊन जावी, असं विधान भाजपचे खासदार साक्षी महाराज (MP Sakshi Maharaj) यांनी केलं आहे, जे नेते आरोप करत आहेत त्यांनी यापूर्वी रामभक्तांवर गोळ्या चालवल्या होत्या, असा हल्लाबोल देखील खासदार साक्षी महाराज (MP Sakshi Maharaj) यांनी केला आहे. Ram temple scam | ayodhya ram scam mandir trust land dispute sakshi maharaj sanjay singh akhilesh yadav

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

काय म्हणाले साक्षी महाराज?

खा. साक्षी महाराज (Sakshi Maharaj) म्हणाले, ‘बाबरी मशिदीजवळ एक पाखरू देखील जाऊ देणार नाही असा उघड दावा करणाऱ्यांना खणखणीत उत्तर त्यावेळी त्यांना देण्यात आले होते.
श्री राम जन्मभूमीवर (Shri Ram Temple) आज एक भव्य मंदिर उभारलं जाणार आहे.
म्हणून अशा वायफळ लोकांकडून कोणता देखील आधार नसलेले आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं कोणतं काम शिल्लक राहिलेलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे साक्षी महाराज (Sakshi Maharaj) म्हणाले की, श्री राम जन्मभूमी (Shri Ram Temple) तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय (Champat Rai) यांनी त्यांचं संपूर्ण जीवन भगवान श्री राम यांना समर्पित केलं आहे.
अशा व्यक्तीवर आरोप करणे अयोग्य आहे.
तरी देखील आम आदमी पक्षाच्या संजय सिंह (Sanjay Singh) यांनी राम मंदिरासाठी (Shri Ram Temple) काही देणगी दिली असेल तर त्याची पावती त्यांनी दाखवावी आणि देणगी परत घेऊन जावी.
तसेच अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी देणगी दिली असेल तर ते देखील देणगी परत घेऊ शकतात.
असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे महाराज म्हणाले, हे तेच लोक आहेत ज्यांनी राम मंदिराला कठोर विरोध केला होता.
असं देखील खा. साक्षी महाराज (Sakshi Maharaj) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Ram temple scam | ayodhya ram scam mandir trust land dispute sakshi maharaj sanjay singh akhilesh yadav

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Maratha Reservation | उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले – ‘…तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार’