आतंकवाद्यांची गोळी देखील ‘निकामी’ ठरणार, जवानांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट, किंमत देखील अर्धी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले की राष्ट्रीय बीआयएस मानकांनुसार बनवलेले बुलेटप्रुफ जॅकेट सुरक्षित, हलके आणि जवळपास 50 टक्के स्वस्त असेल आणि याची निर्यात देखील करण्यात येत आहे. बुलेट प्रतिरोधक जॅकेटवर भारतीय मानक ब्यूरोचे (बीआयएस) मानक असल्याने भारत आता अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनी सारख्या देशाच्या रांगेत स्थान मिळवेल ज्यांच्याकडे आपले स्वत:चे राष्ट्रीय मानक आहे.

पासवान यांनी सांगितले की बीआयएसने बुलेट प्रुफ जॅकेटवर एक राष्ट्रीय मानक तयार केले आहे, ज्यात मेक इन इंडियाला प्रोस्ताहन मिळेल. हे जॅकेट जगातील सर्वात चांगल्या गुणवत्तेचे आहे आणि ज्याचे वजन हलके आहे. जे आपल्या सैनिकांसाठी सुविधाजनक आहेत. या जॅकेटची किंमत 50 टक्क्यांनी स्वस्त असेल. यामुळे याची निर्यात सर्वात जास्त होत आहे. ते म्हणाले की या प्रकारच्या 3.5 लाख जॅकेट्सची मागणी आहे.

10 किलोग्रॅमचे वजन
ते म्हणाले की हे जॅकेट सर्व मापदंडावर उत्तम ठरले आहेत. चांगल्या सुरक्षेसाठीच्या मानाकांनावर हे यशस्वी ठरले आहे. याचे वजन कमी असून ते 50 टक्क्यांनी स्वस्त आहे. या जॅकेटचे वजन 5.5 किलोग्रॅमपासून 10 किलोग्रॅम पर्यंत आहे. जे इतर जॅकेटच्या तुलनेत जवळपास अर्ध्याने कमी आहे आणि त्यात त्वरित रिलीज सिस्टम देखील आहे. किंमत जवळपास 70,0000 रुपये प्रति जॅकेट आहे.

visit : Policenama.com