मुख्यमंत्री फडणवीसच तुम्हाला करणार आहेत मोठे मग आस का वागताय तुम्ही मेटे : रामदास आठवले

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे तुमची मंत्रिपदाची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे, पण तिकडं पाठिंबा दिल्याने ते नाही होणार. त्यामुळे तुम्ही बीड मधील निर्णय बदलावा असा सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. बीड येथील आयोजित सभेत त्यांनी हा सल्ला दिला.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानही पूर्ण झाले आहे. याचदरम्यान, बीड लोकसभा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा महायुतीचा घटकपक्ष असलेल्या शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांचे नाव न घेता टीका केली. इतकेच नव्हे तर, जे आले त्यांच्या सोबत आणि जे आले नाही त्याच्या शिवाय पुढे जाऊ असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर पंकजा मुंडेंनीही मुख्यमंत्री सर तुम्ही आपलं तोंड खराब करून घेऊ नका, मी स्टँडर्ड राजकारण केले आहे. मी जनतेसमोर साष्टांग दंडवत घेईल पण बाकी कोणासमोर झुकणार नाही. असे वक्तव्य केले होते. त्यानंतर बोलतांना रामदास आठवेल यांनी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे तुमची मंत्रिपदाची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे, पण तिकडं पाठिंबा दिल्याने ते नाही होणार. त्यामुळे तुम्ही बीड मधील निर्णय बदलावा असा सल्ला विनायक मेटेंना दिला.

इतकेच नव्हे तर, बोलतांना विनायक मेटेंवर त्यांनी कविताही केली.

आठवलेंची कविता

विनायकजी मेटे, तुम्ही अशी का करताय काम खोटे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच तुम्हाला करणार आहेत मोठे. मग आस का वागताय तुम्ही मेटे. तुम्हला अपेक्षा आहे मंत्रिपदाची, ती होईल पूर्ण पण तिकडं गेल्यावर आस कस होईल. अशी कविता त्यांनी सादर केली.