रामागोपाल वर्मा म्हणाले, ‘मी कोरोना पॉझिटीव आहे’, नंतर मागितली ‘माफी’, जाणून घ्या नेमकं काय झालं

पोलीसनामा ऑनलाईन :फिल्ममेकर रामगोपाल वर्मा यांनी ट्विट करत साऱ्यांनाच हैराण केलं. बुधवारी त्यांनी ट्विट केलं की, डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की, ते कोरोना पॉझिटीव आहेत. या ट्विटनंतर साऱ्यांनाच धक्का बसला. या ट्विटवर एकामागोमाग एक कमेंट्स येताना दिसल्या. यानंतर त्यांनी सॉरी बोलत सांगितलं की, कोरोनाची बातमी खोटी होती.

काय होत रामगोपाल वर्मांचं ट्विट ?

सर्वांना एप्रिलर फूल करण्यासाठी रामगोपाल वर्मांनी लिहिलं की, “माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की, मी कोरोना पॉझिटीव आहे.” यानंतर त्यांनी दुसरं ट्विट करत लिहिलं की, “तुम्हा सर्वांना निराश केल्याबद्दल सॉरी. आता डॉक्टरांनीम मला सांगितलं आहे की, हा एप्रिल फूल जोक होता. डॉक्टरांची चूक आहे, माझी नाही.”

या ट्विटनंतर लोकांनी रामगोपाल वर्मांना भरपूर ट्रोल केलं. कोरोनावरून गंमत केल्यानं अनेक युजर्सनी त्यांना खरंखोटं सुनावलं. जागतिक महामारी बनलेल्या कोरोनाला गंभीरतेनं न घेता त्यावरून लोकांना एप्रिल फूल बनवणं खूप मुर्खतेचं होतं असंही काहींचं म्हणणं आहे. अनेकांनी त्यांनी बेजबाबदारही म्हटलं. यानंतर त्यांनी ट्विटमध्ये माफी मागितली. त्यांनी लिहिलं की, “मी फक्त माहोल थोडा हलका करत होतो. परंतु ही गंमत माझ्यावर होती. तरीही मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो.” असं ते म्हणाले.