मध्य प्रदेशात रामन राघव

भोपाळ | पोलीसनामा ऑनलाईन
ट्रक चालक आणि क्लीनरची हत्या करुन लूटमार करणाºया आंतरराज्य टोळीचा भोपाळ पोलिसांनी पदार्फाश केला आहे. गेल्या आठ वर्षांत ३३ ट्रकचालकांची हत्या करणाºया नऊ जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या टोळीने गेल्या चार महिन्यात १४ ट्रकचालकांना जीवे मारले आहे़.
बालगृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
मध्य प्रदेशच्या मंडीदिप भागात टेलरिंगचे काम करणारा आदेश खामरा या टोळीचा म्होरक्या होता. २०१० साली त्याने अमरावतीमध्ये पहिला खून केला. त्यानंतर दुसरी हत्या नाशिकमध्ये केली. यानंतर हत्यांचं सत्र सुरू झालं. यानंतर खामरा आणि त्याच्या टोळीने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अनेकांचे खून केले. ट्रक चालक आणि क्लिनर्सची हत्या करुन त्यांची ओळख पटेल, असे पुरावे नष्ट करायचे आणि मग त्यांचे मृतदेह निर्जन स्थळी गाडून टाकायचे, अशा पद्धतीने ही टोळी काम करायची. मात्र तरीही काही मृतदेह आढळून आले आणि पोलिसांनी तपास सुरू केला.
[amazon_link asins=’B01JOKVSIE,B078RLDT38′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’be5d6208-b650-11e8-84e9-597c7b92bc1c’]
पोलिसांकडून या हत्यांचा तपास सुरू असताना गेल्या आठवड्यात आदेश खामराला अटक करण्यात आली. त्याने तब्बल ३० हत्यांची कबुली दिल्याने पोलीस चक्रावून गेले. यानंतर त्याने काल आणखी तीन खुनांची माहिती पोलिसांना दिली. उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरच्या जंगलातून खामराला ताब्यात घेण्यात आले़  यानंतर त्याने एका पाठोपाठ एक खुनांची कबुली दिली. यामुळे गेल्या आठ वर्षांमध्ये शेजारच्या राज्यांमध्ये झालेल्या खुनांचा उलगडा होऊ लागला.
मटका किंग तुलसी मसरामच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड
आशियाई क्रीडा स्पर्धेत तायक्वांदोत कांस्य पदक पटकावणाºया आणि सध्या पोलीस अधीक्षक म्हणून काम करणाºया बिट्टू शर्मा यांनी मोठ्या हिमतीने खामराला अटक केली. विशेष म्हणजे खामराला ताब्यात घेताना शर्मा यांना त्यांची पार्श्वभूमी इतकी गंभीर असेल, याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. इतक्या जणांना संपवण्याचं कारण काय, असा प्रश्न पोलिसांनी चौकशीदरम्यान खामराला विचारला. त्यावर ती सर्व माणसं अतिशय हलाखीत जगत होती. त्यामुळे मी त्यांना मुक्ती दिली, असे उत्तर खामरानं हसत हसत पोलिसांना दिले़ त्यामुळे काही दशकापूर्वी मुंबई एका पाठोपाठ हत्या करणाºया रामन राघवची आठवण पोलिसांना आली़
[amazon_link asins=’B00T9RC4XQ,B077FPCGXV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c96eca2b-b650-11e8-84bb-1f5866699dd5′]
टोळीतील सदस्य ट्रक चालक आणि क्लीनरशी मैत्री करुन त्यांना जाळ्यात ओढत. संधी साधून ट्रकचालकांना झोपेचं औषध द्यायचं आणि त्यांची निर्घृण हत्या करायची, अशी टोळीची मोडस आॅपरेंडी (कार्यपद्धती) होती. त्यानंतर त्यांच्याकडील ऐवज लुटायचा, तसंच ट्रकचे सुटे भाग चोरुन महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशात विकायचे.
२०१० पासून मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांतील ३३ ट्रक चालक आणि क्लीनरची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या चार महिन्यांतच  हत्येच्या १४ घटना घडल्या. हत्या झालेल्या ट्रक चालकांची नोंद त्यांनी एका डायरीत केली होती. पोलिसांनी ही डायरी प्रजापतीकडून जप्त केली आहे.