Ramayana : पुन्हा एकदा कुटुंबासोबत पाहू शकाल रामकथा, जाणून घ्या कधी आणि कुठं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ने गेल्या वर्षी छोट्या पडद्यावर रेकॉर्डतोड लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही मालिका स्टार भारतवर प्रसारित केली जाणार आहे. अंशत: लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरात असणार आहेत. त्यामुळे या सर्वांना रामायण पाहता यावे यासाठी पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

रामायण ही मालिका छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी मालिका ठरली आहे. तसेच भारतीय टेलिव्हिजनचा सर्वात प्रतिष्ठित असा शो आहे. भगवान रामच्या या कथा आणि महाकाव्य गाथामध्ये महत्वपूर्ण घटनांचे वर्णन केले गेले आहे. रामायण हा शो खूपच लोकप्रिय झाला आहे. यामध्ये अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया कलाकारांनी भूमिका साकारली आहे. हा शो प्रतिष्ठित शो म्हणून ओळखला जातो. या शोच्या माध्यमातून चॅनेलने लोकांमध्ये सकारात्मक आणि शांती बनवण्यासाठी योग्य उपाय काढला आहे. रामायण हा शो दररोज सायंकाळी 7 वाजता स्टार भारत या चॅनेलवर दाखवला जाणार आहे.

दरम्यान, मागील वर्षी जेव्हा देशभरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तेव्हाही रामायण ही मालिका सुरु करण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच शक्तिमान हा शो देखील सुरु करण्यात आला होता. या मालिकेलाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता रामायण मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.