रामायणातील ‘हे’ कलाकार आज दिसतात असे (फोटो)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – दसरा आला की राम आणि रावणाच्या कथेची सर्वत्र चर्चा होताना दिसते. जेव्हा जेव्हा रामायणाचा विषय येतो सर्वांना 1987 साली आलेल्या रामानंद सागर यांचा पौराणिक शो रामायणची आठवण येतेच.

25 जानेवारी 1987 पासून ते 31 जुलै 1988 पर्यंत प्रासरीत झालेला रामायण शो त्या वेळी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो होता. प्रेक्षकांनी या मालिकेला खूप प्रेम दिलं. या मालिकेती  कलाकार एवढे फेमस झाले की, आजही त्यांना आपल्या पात्राच्या नावानेच ओळखलं जातं. आज दसऱ्याच्या निमित्ताने आपण जाणून घेऊयात की, यातील कलाकार आज नेमकं काय करत आहेत ?

सालों बाद ऐसे दिखते हैं रामानंद सागर की रामायण के स्टार्स, जानें कहां हैं अब

1) अरुण गोविल
रामायणमध्ये रामाची भूमिका साकारून फेमस झालेले अ‍ॅक्टर अरुण गोविल आता काहीसे वेगळेच दिसतात. एका प्लेमध्ये ते पुन्हा एकदा रामाची भूमिका साकारणार आहेत. द लेजेंड ऑफ राम असं या प्लेचं नाव आहे.

सालों बाद ऐसे दिखते हैं रामानंद सागर की रामायण के स्टार्स, जानें कहां हैं अब

2) दीपिका चिखलिया
रामायणमध्ये सीतेची भूमिका साकारलेली अॅक्ट्रेस दीपिकाने 90च्या दशकात हिंदी सोबतच साऊथ आणि गुजराती सिनेमातही काम केलं आहे. 2018 मध्ये त्यांनी पुन्हा वापसी केली आहे. गालिब सिनेमात त्यांनी काम केलं आहे.

सालों बाद ऐसे दिखते हैं रामानंद सागर की रामायण के स्टार्स, जानें कहां हैं अब

3) दारा सिंह
दारा सिंह यांनी रामायणमध्ये हनुमानाची भूमिका साकारली होती. दारा सिंह यांनी हनुमानाच्या रोलमध्ये जो बेंचमार्क स्थापित केला आहे त्याला क्वचितच कोणी स्पर्श केला आहे. बॉलिवूडमधील अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. आज दारा सिंह हयात नाहीत परंतु बॉलिवूडमधील अनेक यशस्वी अभिनेत्यांपैकी ते एक आहेत. 12 जुलै 2012 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सालों बाद ऐसे दिखते हैं रामानंद सागर की रामायण के स्टार्स, जानें कहां हैं अब

4) अरविंद त्रिवेदी
रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी सर्वांचे फेवरेट बनले होते. जेव्हा रावणाचा विचार केला जातो तेव्हा अरविंद त्रिवेदी यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय रहात नाही. सध्या ते इंडस्ट्रीपासून दूर आहेत. एखाद्या इव्हेंटमध्ये ते दिसतात. 70 ते 90 च्या दशकात त्यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.

सालों बाद ऐसे दिखते हैं रामानंद सागर की रामायण के स्टार्स, जानें कहां हैं अब

5) ललिता पवार
बॉलिवूडमधील सर्वात खरतनाक सासू आणि आईच्या रुपात प्रसिद्ध झालेली अॅक्ट्रेस ललिता पवार यांनी सीरीयल रामायणमध्ये मंथराची भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाची आजही चर्चा होताना दिसते. ललिता यांनी हिंदी सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीत मोठं योगदान दिलं आहे. 1998 साली वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

सालों बाद ऐसे दिखते हैं रामानंद सागर की रामायण के स्टार्स, जानें कहां हैं अब

6) सुनील लहरी
रामायणमध्ये सुनील लहरी यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. अरुण गोविल यांच्या सोबत सुनील लहरी यांना आजही स्मरलं जातं. सध्या सुनील इंडस्ट्रीपासून दूर आहेत.

Visit : Policenama.com