अयोध्येत भूमिपूजनाची तयारी, TV वरील राम म्हणाले – ‘ही एका दिव्य युगाची सुरुवात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राममंदिरासाठी भूमीपूजनाबद्दल लोकांमध्ये खूप आनंद आणि उत्सुकता आहे. हा आनंद साहजिक आहे, अखेर ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर हा शुभ मुहूर्त आला आहे. या शुभ मुहूर्तावर रामायण मालिकेतील ‘राम’ अभिनेता अरुण गोविल यांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी रामभक्तांना नमन करत एक ट्विट केले आहे.

अरुण लिहितात- ‘अयोध्येत राम मंदिरासाठी अनेक वर्षे सतत झगडत असणार्‍या ज्येष्ठांना आणि ती लढाई भूमिपूजनापर्यंत आणणाऱ्या सर्व भक्तांना माझे कोटी-कोटी प्रणाम. तुम्हा सर्वांच्या उत्तम प्रयत्नांमुळेच हा दिवस पाहण्याचे भाग्य आम्हाला प्राप्त होत आहे. जय श्रीराम.’ यापूर्वी त्यांनी राम मंदिराच्या पायाभरणीवर ट्विट केले होते. त्यांनी लिहिले होते- ‘भगवान श्रीराम यांच्या मंदिराच्या पायाभरणीसाठी सर्व मानवजात प्रतीक्षा करत आहे. अयोध्येत भूमीपूजनासह एका दिव्य काळाची सुरुवात होईल. जय श्रीराम.’

बुधवारी राममंदिराचे भूमिपूजन केले जाईल. संपूर्ण अयोध्या यासाठी सज्ज आहे. प्रत्येक घरात दीपोत्सव होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकापासून राजकारणी आणि सेलिब्रिटीपर्यंत मंदिराच्या पूजेसाठी या शुभ मुहूर्ताची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दूरदर्शनवर जेव्हा पुन्हा दिसले अरुण
अभिनेता अरुण गोविल हे रामायण मालिकेत रामाच्या भूमिकेत दिसले होते. लॉकडाऊन दरम्यान रामानंद सागर यांची मालिका रामायण दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित केली, तेव्हा मालिकेचे सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले. अरुण गोविल यांना लोकांचा प्रेमळ संदेश मिळाला आणि त्यांनी या सन्मानाबद्दल लोकांचे आभारही मानले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like