CM योगी आदित्यनाथ यांच्या वाढदिवसानिमित्त अरुण गोविलनं दिल्या शुभेच्छा, म्हणाले – ‘संन्याशीपेक्षा चांगला राजा दुसरा कोणीच नाही’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज (शुक्रवार दि 5 जून 2020) 48 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतील राम अरुण गोविल यांनी ट्विट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचं कौतुक करताना गोविल यांनी रामायणमधील काही ओळीही लिहिल्या आहेत.

अरुण गोविल यांनी ट्विट केलं की, “संन्याशीपेक्षा चांगला राजा दुसरा कोणी असू शकत नाही. रामायणमधील हे विधान सार्थ करणारे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

अरुण गोविल यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत की, गोविल जे काही बोलत आहेत ते एकदम बरोबर आहे. याशिवाय अरुण गोविल यांच्या या ट्विटवर कमेंट करत योगी आदित्यनाथ यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजूनही ट्विट व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी यावर कमेंट करत व्यक्त होताना दिसत आहेत.

अनेक चाहत्यांनी रामायणधील राम संन्याशीपेक्षा चांगला राजा दुसरा कोणी असू शकत नाही हे वाक्य बोलत असतानाचा व्हिडीओदेखील सोशलवर शेअर केला आहे.