Ramayan Serial | ‘रामायण’मधील ’सुमंत’चे निधन; राजेश खन्ना-अमिताभ बच्चन यांच्या सोबत केले होते काम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्हीवरील लोकप्रिय मालिका रामायणमधील (ramayan serial) आणखी एका पात्राने जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर (actor chandrashekhar) यांचे 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी आज सकाळी 7 वाजता अखेरचा श्वास घेतला. चंद्रशेखर यांनी लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमध्ये (ramayan serial) सुमंत ची भूमिका साकारली होती. ते टीव्ही अभिनेता  शक्ती अरोराचे आजोबा होते. ramayan serial sumant actor chandrashekhar and tv actor shakti aroras grand father passed away

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

चंद्रशेखर यांचा मुलगा प्रोफेसर अशोक चंद्रशेखर यांनी त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अशोक यांनी सांगितले की, त्यांचे वडील चंद्रशेखर यांच्यार अंत्यसंस्कार आज सायंकाळी 3 वाजता विलेपार्ले स्मशानभूमीत केले जातील. चंद्रशेखर यांचा मृत्यू वाढत्या वयामुळे होणार्‍या समस्यांमुळे झाला. त्यांनी रामायण मालिकेतद्वारे प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळवली होती.

चंद्रशेयर यांची माहिती
* चंद्रशेखर यांचा जन्म 7 जुलै 1922 मध्ये झाला होता.
* चंद्रशेखर यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर विद्या आहे.
* जीवनात त्यांनी मोठा संघर्ष केला होता.
* 13 व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.
* इयत्ता सातवीनंतर शोळा सोडावी लागली. यामुळे चंद्रशेयर यांना रखवालदाराची नोकरी सुद्धा करावी लागली होती.
* ते भारत छोड़ो आंदोलनात सहभागी झाले होते.
* त्यांनी औरत तेरी यही कहानी चित्रपटातून पदार्पण केले होते. हा चित्रपट व्ही. शांताराम यांनी 1954 मध्ये बनवला होता.
* सुमारे 112 प्रोजेक्टमध्ये काम केले.

 

गाजलेले चित्रपट

* चंद्रशेयर यांनी काली टोपी लाल रुमाल, बिरादरी, स्ट्रीट सिंगर आणि रुस्तम-ए-बगदाद सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडली.
* कटी पतंग, बसंत बिहार आणि शराबी चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
* चंद्रशेखर यांनी भारतीय सिनेमात 1964 मध्ये रिलीज चित्रपट चा चा चा मधून या नावाचा डान्स फॉर्म इंट्रोड्यूस केला होता.

Wab Title :- ramayan serial sumant actor chandrashekhar and tv actor shakti arora s grand father passed away

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप