‘कंगणाला RPI संरक्षण देईल, सत्तेत असणाऱ्या शिवसेनेनं धमकी देणं योग्य नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि राज्यातील सरकार यांच्या सुरु असलेल्या शाब्दिक युध्दामध्ये आता रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उघडी घेतली आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे सरकारमधील तीन पक्षातील नेत्यांनी कंगनावर टीका केली आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि इतर नेत्यांनीही मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, हे मान्य नसेल तर त्यांनी बाप दाखवावा अशा शब्दांत कंगनावर हल्लाबोल केला आहे.

या वादात आता रामदास आठवले यांनी ट्विट करुन सत्तेत असलेल्या शिवसेनेने धमकी देणं योग्य नसल्याचं म्हटलंय. रामदास आठवले यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अभिनेत्री कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला आरपीआय संरक्षण देईल, असं आठवले यांनी ट्विटरद्वारे जाहीर केलं आहे.

दरम्यान, जे भाजपच्या पोटात आहे तेच गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगनाच्या मुखातून आणि ट्विटमधून बाहेर येत आहे. कंगनाला पुढे करुन मुंबई पोलीस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाह, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.