Ramdas Athawale | “आरपीआय बरोबर असताना भाजपाला मनसेची गरज काय?”; रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Ramdas Athawale |  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्याच्या आणि उत्तरसभेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांसह शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) खास करून लक्ष्य केलं. मात्र त्यांनी भाजपबाबत (BJP) एक शब्दही काढला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात मनसे-भाजप युतीच्या चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र अशातच आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाजपला सल्ला दिला आहे.

 

भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याचे त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आरपीआय (RPI) बरोबर असताना भाजपला मनसेची गजर काय?, असा सवाल रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) उपस्थित केला आहे. यावेळी आठवलेंनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला.

 

मनसेच्या सभेला गर्दी होत असली, तरी मते मात्र मिळत नाहीत. मशिदीवरील भोंगे काढण्याची जी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली त्याच्याशी रिपब्लिकन पक्ष सहमत नाही. संविधानाने तो अधिकार दिला असून महाराष्ट्रात लोकशाही (Democracy) आहे, रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यासोबत आठवलेंनी शरद पवारांची पाठराखण केली आहे.

 

दरम्यान, शरद पवार हे जातीयवादी नेते नाहीत त्यांनी कधीही जातीयवादी राजकारण केलं नसून पवार हे धर्मनिरपेक्ष असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

 

Web Title :- Ramdas Athavale | bjp should not form an alliance with mns said union minister ramdas athavale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा