‘राज ठाकरेंच्या सभेला फक्त गर्दी होते, मतं मिळत नाहीत’,’या’ केंद्रीय मंत्र्यांचा टोला

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाअधिवेशनादरम्यान आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण झाले. मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर विरोधी पक्षांकडून मनसेवर टीका होऊ लागली आहे. तर शिवप्रेमी संघटनांकडून झेंड्याचा विरोध केला जात आहे. मनसेने झेंडा बदलल्याने काहीही होणार नाही. मनसेने झेंडा बदलण्या पेक्षा मन बदलावे, असा सल्ला रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. मनसेच्या सभेला गर्दी होते, पण त्यांना मते मिळत नाही. आता पक्षाचा झेंडा बदलला आहे. त्याने काहीही फरक पडणार नाही, असे रामदास आठवले यांनी खोचक टोला लगावला आहे. संगमनेर येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले बोलत होते.

मनसेच्या सभेला गर्दी होते मात्र त्यांना मते मिळत नाही. आता तर त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडाच बदलला आहे. झेंडा बदलल्याने काहीही फरक पडणार नाही. पक्षाने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे असे आठवले म्हणाले. तसेच भाजपने मनसेसोबत युती करू नेये असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखापर्य़ंत कर्जमाफी दिली. मात्र, ही कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करून देण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पाळावे. सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी रामदास आठवले यांनी यावेळी केली.

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग
पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून पाकने तो भाग भारताला द्यावा. युद्ध न करता पाकने पुढाकार घेत जर पाकव्याप्त काश्मीर दिला तर योग्यच नाही तर युद्ध करून तो भाग भारताने काबीज करावा, अशी आमची भूमिका असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –