Ramdas Athavale | रामदास आठवलेंसह रिपब्लिकन पक्षाचे नेते नारायण राणेंच्या भेटीला, दिला हा महत्वाचा सल्ला

मुंबई ꓽ पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणेंनी (Union Minister Narayan Rane) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं. यावरून राणेंना अटक झाली आणि कोर्टाने त्यांना जामीन देखील मंजूर केला. मागील दोन दिवसापासून याची राज्यभर चर्चा सुरु आहे. या घडामोडीनंतर राणेंना भाजपने संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. यांनतर बुधवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी थेट घेतली आहे. भेटीसाठी त्यांनी थेट नारायण राणे यांचं जुहू येथील निवासस्थान गाठलं आहे. राणेंची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा असल्याचं आठवलेंनी (Ramdas Athavale) सांगितलं आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे.
नारायण राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक असून चुकीची असल्याचं देखील रामदास आठवले यांनी त्यावेळी म्हटलं आहे.
त्यावेळी रामदास आठवले म्हणाले, राणे यांना पाठिंबा देण्यासाठी मी त्यांची भेट घेतलीय.
पोलिसांनी राणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे.
मात्र, राणे हे अशा कारवाईनं डगमगणारे नेते नाहीत. ते खंबीर आणि नीडर नेते आहेत.
या प्रसंगात मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष (RPI) राणे यांच्या पाठिशी असल्याचं आठवले यांनी स्पष्ट केलंय.

 

या दरम्यान, पुढं सांगतांना रामदास आठवले यांनी राणेंना सल्ला देखील दिल्याचं समजते.
की, दिल्लीत येऊन घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना द्यायला हवी.
कशी चुकीची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आलीय, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवी,
असा सल्ला रामदास आठवले यांनी नारायण राणे यांना दिला आहे.
यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, एम एस नंदा, प्रकाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title : Ramdas Athavale | union minister ramdas athawale meet narayan rane yesterday at mumbai juhu residence

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ransom Case on Police Officer | पोलिस उपायुक्तांसह 2 पोलिस निरीक्षकांवर खंडणीचा गुन्हा

Tax Benefits on Home Loan | फायद्याची गोष्ट ! होम लोनवर कशाप्रकारचे मिळतात TAX बेनिफिट्स, जाणून घ्या सविस्तर

FIR on Police Inspector | पोलिसाची सटकली ! पान द्यायला झाला उशीर, रिक्षाचालकाला बेदम मारहाण, पोलीस निरीक्षकासह तिघांवर FIR