‘शरद पवारांचा EVM वर संशय, पण आमचा पवारांवर नाही’ : रामदास आठवले

मुंबई पोलिसनामा ऑनलाईन – नुकतेच मोदी सरकारमध्ये  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या रिपाइंचे सर्वेसर्वा तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘शरद पवारांना टोला लगावला आहे .ते म्हणाले कि, पवार साहेबांचा ईव्हीएम मशीनवर संशय आहे.परंतु आमचा त्यांच्यावर संशय नाही. त्यांना  NDA त येण्याचा सल्लाही आठवलेंनी दिला आहे. वसईत एका आयोजित कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.

पवार साहेबांनी ईव्हीएमबाबत अनेकदा संशय व्यक्त केला आहे. काका आणि पुतणे यांच्यामध्ये ईव्हीएम विरोधात मतभेद आहेत,दोघांची भूमिका वेगवेगळी आहे. ईव्हीएमबाबत अजित पवार यांचीच भूमिका योग्य असल्याचे आठवले यांनी म्हंटले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांच्यावरही जोरदार टीकाही केली. ते म्हणाले कि,मनसे आणि वंचित हे दोघेही स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. नुकतेच येणाऱ्या विधानसभेसाठी घटकपक्षांना २० जागा हव्या असून २० पैकी १० जागा आरपीआयला मिळाव्यात अशी मागणी रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी केली आहे.

दरम्यान, कोल्हापूर येथे बोलताना आठवले यांनी वंचित वर टीका केली होती ते म्हणाले कि ,वंचित आघाडी ही वंचितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. त्यामुळे आंबेडकरांना सत्ता हवी असेल तर एनडीएमध्ये यावं, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी