काय सांगता ! रामदास आठवले बिग बॉस २ मध्ये ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन लवकरच सुरु होत आहे. या सीझनचे निवेदन महेश मांजरेकर करणार आहेत. या सीझनचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमुळे मात्र रिपाईचे नेते रामदास आठवले ‘बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये लवकरच दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

‘हिंदी बिग बॉस नंतर मराठी बिगबॉस चे पहिले पर्व खूपच गाजले. आता दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण असणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता बिग बॉसचा पहिला प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोत एक राजकीय नेते भाषण देतात आणि काव्यात्मक पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करतात. नंतर या शोचे होस्ट महेश मांजरेकर ‘कवीमनाचे नेते, होणार का बिग बॉसचे विजेते’ असा प्रश्न प्रेक्षकांना विचारतात.

कविमनाचे नेते म्हणून रामदास आठवले प्रचलित आहेत. आता बिगबॉस मधून देखील ते लवकरच दिसणार अशी चर्चा आहे. बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती ही मेघा धाडे होती.