Ramdas Athawale Adopts Leopard | काय सांगता ! होय, रामदास आठवलेंनी घेतला बिबट्या दत्तक, ठेवलं ‘हे’ खास नाव !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Athawale Adopts Leopard | केंद्रीय मंत्री रामदास आठवले नेहमी आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. लोकसभेमध्येसुद्धा त्यांच्या भाषणात ते खास कविता सादर करतात तेव्हा विरोधकांनाही हसू आल्याशिवाय राहत नाही. आता ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे आठवलेंनी आता एक बिबट्याच दत्तक (Ramdas Athawale Adopts Leopard) घेतला आहे.

 

वन्यप्राणी दत्तक योजनेनुसार (Wildlife Adoption Scheme) मुंबईतील नॅशनल पार्कमधून (National Park) बिबट्या दत्तक घेतल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं. तसेच प्राणीमित्रांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा, असा संदेश त्यांनी दिला. रामदास आठवलेंनी या बिबट्याचं नाव ‘पँथर’ असं ठेवलं आहे. आठवलेंनी एक व्हिडीओही ट्विट केला आहे.

 

 

यावेळी बोलताना रामदास आठवले यांनी भोंग्यांबाबत (Loudspeakers) आपली भूमिका मांडताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना शांततेचा मार्ग स्वीकारावा, असा सल्ला त्यांनी दिला. राज ठाकरे यांनी भोंग्याला विरोध करण्याचं काही कारण नाही, भगवा हे शांततेचं प्रतीक आहे. जर राज ठाकरे यांनी अंगावर भगवा चढवला असेल तर त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा, असं आठवले म्हणाले.

 

दरम्यान, मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आमचा विरोध असून मौलानांनीही चुकीचं वक्तव्य करू नये. मुस्लिम समाजानेही त्यांचं ऐकू नये कारण कुराण (Quran) शांततेचा मार्ग सांगतो आपण हिंसेची भाषा करणं चूक असल्याचं आठवलेंनी सांगितलं.

 

Web Title :- Union minister ramdas athawale adopts leopard from mumbai named rhythm heavy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा