Ramdas Athawale | ‘मुख्यमंत्रीपदाची फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही’, आठवलेंचा नाना पटोलेंना सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्याचवेळी अकोला येथील एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रदर्शित केली. पटोले यांच्या वक्तव्यावरुन राज्यात राजकीय पडसाद उमटण्या सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress), शिवसेना (Shiv Sena), यांच्याकडून याबाबत सावध प्रतिक्रिया देण्यात आली. मात्र, विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तसेच, पटोले (Nana Patole) यांच्या विधानावरून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

काय म्हणाले आठवले?

मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, ‘फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षानं मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला पाहिजे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर तरलेलं सरकार आहे.
काँग्रेसनं पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल.
म्हणून काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरावा आणि हे पद दिलं जात नसेल तर काँग्रेसनं महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा.
असा एक सल्ला रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी काँग्रेसला दिला आहे.

दरम्यान, पटोले (Nana Patole) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
तसंच, काँग्रेस निवडणूक लढवण्याचा स्वबळाचा नारा दिला.
त्यावरून अनेक पक्षाकडून प्रतिक्रिया दिल्या गेल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचे सांगतानाच 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेला आहे.

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

संजय राऊत म्हणाले..

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पटोले यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेस स्वबळावर मोदींना व भाजपला पराभूत करू शकणार असेल तर आम्ही सर्वजण काँग्रेसच्या पाठिशी राहू, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

अजित पवार  म्हणाले..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही नाना पटोले (Nana Patole) यांच्या विधानावर भाष्य केलं आहे.
‘महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे.
तसेच, स्वप्न बघण्याचा अधिकारही सगळ्यांना आहे.
प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते.
सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा फॉर्मुला ठरला आहे, असं पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

 

Web Title : Ramdas Athawale and Nana Patole। cm post rpi leader ramdas athawale advices congress

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

चीन्यांना भारतीयांनी दिले सडेतोड उत्तर; 43 % लोकांनी खरेदी केल्या नाहीत चीनी वस्तू