…म्हणून ‘धुमधडाका’ चित्रापटातील अभिनेत्रीला रामदास आठवलेंनी दिला ‘आसरा’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउनमुळे अनेकजण घरापासून दूर अडकून बसले आहेत. त्यामुळे अनेकांना अन्नधान्यांची कमतरता भासू लागली आहे. अशा व्यक्तींना मदत सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी हात पुढे केला आहे. त्यांनी नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, जेवण देण्यासोबतच एका वयोवृद्ध आणि गरजू मराठी अभिनेत्रीला आसरा दिला आहे.

‘धुमधडाका’ या चित्रपटात भूमिका साकारणार्‍या ऐश्वर्या राणेला आठवले यांनी मदतीचा हात दिला आहे. . ऐश्वर्या या सिंधुदुर्ग येथील त्यांच्या गावाच्या दिशेने निघाल्या होत्या. परंतु, लॉकडाउनमुळे पोलिसांनी त्यांना अडवून मुंबईत परत जाण्याचे आदेश दिले. दरम्यान त्यांचे कपडे आणि सर्व सामान चोरीला गेले. त्यानंतर त्या मुंबईला परतल्या आणि त्यांनी आठवले यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून रामदास आठवलेंनी ऐश्वर्या यांना त्यांच्या घरात आसरा दिला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात लॉकडाउन सुरु झाल्यापासून आठवले हे वांद्रे येथील संविधान बंगल्यावर गरजू नागरीकांसाठी नित्यनेमाने अन्नधान्य वाटप आणि जेवणाची व्यवस्था करीत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या यांनी ‘धुमधडाका’मध्ये अशोक सराफ यांच्या नायिकेचे काम केले होते. त्यांनी या चित्रपटात अशोक सराफ यांच्याबरोबर केलेले प्रियतम्मा हे गाणे विशेष गाजले होते. परंतु अशोक सराफ यांच्या प्रियतम्मा ओखळताही येणार नाही अशा अवस्थेत आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.