Ramdas Athawale | IT च्या छाप्यानं अजित पवारांना काही फरक पडणार नाही – रामदास आठवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयकर विभागाने (IT) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्ती यांच्या घरावर कार्यालयावर छापे मारले. यावरुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयकर विभागाच्या छाप्यानं अजित पवार यांना काही फरक पडणार नाही, अंस विधान रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे. ते पुण्यात (Pune) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच आयकर विभाग (IT), ईडी (ED), सीबीआय (CBI) यासारख्या यंत्रणांकडून सुरु असणाऱ्या चौकशीमागे केंद्राचा कोणताही हात नसल्याचे स्पष्टीकरण रामदास आठवले यांनी दिले.

 

पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. पाकिस्तानकडून (Pakistan) जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आतंकवादी हल्ले (Terrorist attack) करण्याचा डाव रचला जातोय. तिथे काम करणाऱ्या मजुरांवर आतंकवादी हल्ले सुरु आहेत. अनेकजण उद्योग करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये येत असतात त्यांना आतंकवादी ठार मारत आहेत, असं आठवले यांनी सांगितले. तसेच पाकिस्तानचे फार लाड करुन चालणार नाही. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक (Surgical strike) करायला पाहिजे, असं मतही आठवलेंनी व्यक्त केलं.

 

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये
भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत (India-Pakistan cricket match) बोलताना रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळू नेये असे माझ्या पक्षाचे मत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये हे जरी खरे असले तरी अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असे माझे मत असल्याचे आठवले यांनी म्हटले.

RPI असताना भाजपला मनसेची गरज नाही
आरपीआय असताना भाजपला मनसेची (MNS) गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते.
त्यांचा परप्रांतीयांचा मुद्दा भाजपला नुकसानकारक ठरेल. भाजपने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नादी लागू नये,
आम्ही भाजपचा (BJP) नाद सोडला तर ते आमचा नात सोडणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

 

Web Title :- Ramdas Athawale | deputy cm ajit pawar will not be affected raid income tax department statement central government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,968 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation Vaccination | पुणे महापालिकेच्या ‘व्हॅक्सीन ऑफ व्हिल्स’ उपक्रमाला घरगुती कामगार, कलाकार, झोपडपट्टीतील नागरिक, मजूर वर्गाचा भरभरून प्रतिसाद

State Bank of India | खुशखबर ! ‘या’ बँक ग्राहकांना घरबसल्या मिळणार 20 हजार रूपयांपर्यंत कॅश, जाणून घ्या काय आहे ही सर्व्हिस