रामदास आठवलेंनी घेतली कंगनाची भेट, म्हणाले – ‘मुंबई सर्वांची, घाबरण्याचं कारण नाही’

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई पोलिसांवर भाष्य केले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्ताधारी शिवसेना आणि कंगना रनौत यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. रामदास आठवले आणि कंगना रनौत यांची सुमारे एक तास भेट झाली. बैठकीनंतर रामदास आठवले म्हणाले, ‘कंगना रनौत यांची भेट घेतल्यानंतर मी त्यांना सांगितले की, मुंबईत त्यांना घाबरण्याची गरज नाही. मुंबई प्रत्येकाची आहे. माझा पक्ष नेहमीच कंगनाबरोबर राहील. कंगना ही राष्ट्रवादी मुलगी आहे.

रामदास आठवले म्हणाले, ‘कंगनाने तिच्या कार्यालयातही तोडफोड केल्याचे सांगितले. तिच्या कार्यालयातील फर्निचरचे नुकसान झाले आहे. कंगना रनौतने मोठ्या नुकसानीविषयी सांगितले आहे. दरम्यान, कंगनाला यापुढे भीती बाळगण्याची गरज नाही.

ऑफिसवर चढविला गेला बुलडोजर
दरम्यान, पाली हिल रोडवरील कंगना रनौतच्या कार्यालयावर बुलडोझर चालवल्याबद्दल बीएमसी आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका झाली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही कंगनाच्या समर्थनार्थ आले आहेत. बुधवारी त्यांचे कार्यकर्तेही कंगनाच्या समर्थनार्थ मुंबई विमानतळावर पोहोचले. रामदास आठवले हे आरपीआय (ए) चे प्रमुख आहेत. तसेच त्यांचा पक्ष एनडीएमध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) चा पाठिंबा देणारा पक्ष आहे. रामदास आठवले स्वत: कंगना रनौत यांना पाठिंबा देण्याविषयी बोलले आहेत. यानंतर रामदास आठवले कंगना रनौत यांना भेटायला गेले.

उद्धव ठाकरे यांना केले गेले लक्ष्य
बुधवारी बीएमसीने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक व्हिडिओही बनविला. व्हिडिओमध्ये त्यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला. उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत कंगना म्हणाली, “आज माझे घर तुटले आहे, उद्या तुझा गर्व तुटेल.”