Ramdas Athawale | PM मोदींच्या निर्णयामुळे टीका करणाऱ्या महाविकास आघाडीचे तोंड बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील 18 वर्षावरील सर्व वयोगटांचे लसीकरण (Vaccination) मोफत करण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून (pantpradhan garib kalyan yojana) देशभरातील 80 कोटी नागरिकांना येत्या दिवाळीपर्यंत मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय स्वागतर्ह असल्याचे मत केंद्रीय समाजिक राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानांचा आदर्श घेऊन राज्यात महाविकास आघाडी सरकारनंही (Mahavikas Aghadi government) राज्यातील गरिबांना मदत करावी, असा सल्ला दिला.

Pune Education News | RTE 25 % ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शुक्रवार पासून सुरु, पालकांना मिळणार 20 दिवसांचा कालावधी

जाणून घ्या कम्प्युटरसंबंधी 50 महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

टीका करणाऱ्यांचे तोंड बंद
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाचं कौतुक करणारं एक ट्विट रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे.
या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर (State Government) निशाणा साधला आहे.
18 वर्षावरील सर्वांना मोफत लस आणि गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा स्वागतार्ह निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे.
या निर्णयामुळे केंद्रावर टीका करणारे महाविकास आघाडीचे तोंड बंद झाले आहे.
महाविकास आघाडीने पंतप्रधानांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील (Maharashtra) गरिबांना त्वरित मदत करावी, असे आठवले (Ramdas Athawale) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये त्रुटी! इन्फोसिस आणि नंदन नीलकणी यांच्यावर भडकल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन

ताळमेळ नसलेले व गोंधळलेले सरकार
दरम्यान, नवी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी,
राज्यातील ठाकरे सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु असून मंत्री एक विधान करतो,
तर दुसरा दुसरे बोलतो. त्यामुळे ताळमेळ नसलेले व गोंधळलेले हे सरकार आहे.
या सरकारच्या कामावर आम्ही समाधानी नाही,
अशी टीका केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती.

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

Mansoon in Mumbai | मुंबईत आगामी 3 दिवस जोरदार पाऊस; प्रशासनाकडून ‘त्या’ इमारती रिकाम्या करण्याचा आदेश