Ramdas Athawale on MNS | रामदास आठवलेंचा मनसेला इशारा; म्हणाले – ‘मशिदीवरून जर भोंगे काढले तर…’

पिंपरी – चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Athawale on MNS | पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांची पत्रकार परिषद पार पडली.
त्यावेळी आठवले यांनी थेट मनसेला (MNS) इशारा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी 3 मे रोजी सर्व मिशिदींवरील भोेंगे (Loudspeaker On Masjid) काढण्याचा इशारा दिला.
यावरुन आता रामदास आठवले यांनी ‘3 मे रोजी जर कोणी मिशिदींवरील भोंगे काढायला आले तर माझे कार्यकर्ते त्याचं संरक्षण करणार आहेत.
आम्ही ही दादागिरी करू शकतो’, असा इशारा मनसेला दिला आहे.

 

त्यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, ”सध्या महाराष्ट्रात भोंग्याचा विषय सुरू आहे, मशिदींवर अनेक वर्षे भोंगे आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी कधी भोंग्याला विरोध केला नाही, पण राज ठाकरे यांनी भगवे घालून भोंग्याला विरोध करू नये, आमचा भोंगे काढण्यास विरोध आहे.
राज ठाकरे यांनी केलेला विरोध चुकीचा, समाज अल्पसंख्याक आहे धमकीची भाषा कोणी करू नये,”
असा इशारा त्यांनी दिला. (Ramdas Athawale on MNS)

पुढे रामदास आठवले म्हणाले, ”राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण यांच्या वेळ प्लॅनड असतात.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पण सभा मोठ्या होत होत्या. त्यांनी भगवा झेंडा केला आनंद आहे त्यांना भगवा हवा होता तर त्यांनी शिवसेना सोडायला नको होती, शिवसेना कार्यप्रमुख म्हणून राज ठाकरे यांनीच नाव सुचवलं होतं पण परत शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला.”

 

दरम्यान, ”3 मे रोजी जर कोणी मिशिदींवरील भोंगे काढायला कोणी आले तर माझे कार्यकर्ते त्यांचं संरक्षण करणार आहेत.
आम्ही ही दादागिरी करू शकतो, पोलिसांनी यात लक्ष घालण गरजेचे आहे.
मुस्लिम नेत्यांनी पण संयम पाळला पाहिजे, अजान थोडा वेळाची असते.
त्यामुळे राज ठाकरे यांची भूमिका चुकीची असल्याचं,” रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Ramdas Athawale on MNS | if anyone blows the trumpet from the mosque on may 3 we will provide protection ramdas athawale

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा