Ramdas Athawale | सुषमा अंधारे आधी आमच्या पक्षात होत्या; टीका करण्यासाठी शिवसेनेने त्यांना पक्षात घेतले – रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे माझ्या पक्षात होत्या. पण, शिवसेनेत नेत्यांची कमी आहे, म्हणून त्या तिकडे गेल्या आणि शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिले आहे, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले आहेत. रामदास आठवले (Ramdas Athawale) शुक्रवारी कल्याणमध्ये माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेने सुषमा अंधारेंना टीका करण्यासाठीच आपल्या पक्षात घेतले आहे. सुषमा अंधारे आमच्याही पक्षात होत्या, पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या तशा फरड्या, संघर्षशील वक्त्या आहेत. त्या काही वर्षे माझ्या पक्षात होत्या. पण, सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे त्यांना उपनेतेपद दिले गेले आहे. सुषमा अंधारे टीका करण्यात हुशार आहेत. त्यांचा टीका करण्यात हातखंडा आहे. पण त्यांनी सारखी टीका करू नये. टीका करायला हरकत नाही, पण सतत टीका करणे योग्य नाही, असेही रामदास आठवले (Ramdas Athawale) सुषमा अंधारे यांच्यावर बोलताना म्हणाले.

यावेळी आठवलेंनी सीमावादावरदेखील भाष्य केले. मराठी माणसांना महाराष्ट्रात घ्यावे, अशी आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय योग्य तो निकाल देईल. पण, अलीकडे हा मुद्दा चिघळला आहे.
महाराष्ट्रात असंतोष पाहायला मिळत आहे. कुणी कर्नाटकमध्ये, कुणी तेलंगणामध्ये,
तर कोणी आम्हाला गुजरातमध्ये जायचे आहे, असे म्हणत आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी फारशी चांगली नाही.
सीमावर्ती लोकांकडे अनेक वर्षे लक्ष दिले गेले नाही. त्यांना प्यायला पाणी मिळत नाही.
यापूर्वीच्या सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पण आता शिंदे फडणवीस सरकार त्यांच्याकडे लक्ष पुरवत आहे,
असे रामदास आठवले म्हणाले.

Web Title :-Ramdas Athawale | ramdas athawale claim sushma andhare was in his party before joining shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Traffic Police | आता अल्पवयीनांना गाडी चालवताना होणार ‘इतक्या’ रुपयांचा दंड

Pakistan Webseries | सोशल मीडियावर होतोय ‘या’ पाकिस्तानी वेबसीरिजला प्रचंड विरोध; पहिला भाग युट्यूबवर प्रदर्शित