Ramdas Athawale | रामदास आठवलेंची शरद पवारांना एनडीए सोबत येण्याची ‘ऑफर’ तर राहुल गांधींना तोंड सांभाळून बोलण्याचा ‘सल्ला’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना एनडीएसोबत (NDA) येण्याची ऑफर दिली आहे. देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी नागालँडप्रमाणे इतर ठिकाणीही एनडीएसोबत यावं असं रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे. तर त्याचवेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना तोंड सांभाळून बोलण्याचा सल्ला त्यांनी दिला. रामदास आठवले सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, नागालँडप्रमाणे (Nagaland) देशाच्या विकासासाठी शरद पवार यांनी एनडीएसोबत यांव. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे चांगले संबंध आहेत. नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक वेळा शरद पवार यांचे कौतुक झाले आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या झालेल्या कारवाईवर बोलताना कारवाईचे समर्थन केले आहे.

 

राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली करावाई योग्य असल्याचे सांगत राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत, या कारवाईत भाजपचा (BJP) संबंध नसून राहुल गांधी यांनी आपलं तोंड सांभाळून बोलायला पाहिजे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करुन काँग्रेसचा (Congress) फायदा होत नाही आणि पक्ष देखील वाढत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरेंना सल्ला
राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांनी भोंग्याचा मुद्दा न वाढवता मंदिरावर भोंगे कसे लावता येतील हे बघावे.
भोग्यांना विरोध करू नये. त्यांनी चांगले काम करुन आपला पक्ष वाढवावा,
असा सल्ला आठवले यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना दिला.
बाळासाहेब (Balasaheb Thackeray) असते तर उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) ही वेळ आली नसती,
शिवसेना (Shivsena) घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

 

Web Title :- Ramdas Athawale | ramdas athawale offer to sharad pawar join nda and advice to rahul gandhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | वानवडी गावात टोळक्याचा धुडगूस; वाहनांवर दगडफेक करुन केली नासधुस

Dhule Accident News | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत

Uddhav Thackeray Rally in Malegaon | उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी एकनाथ शिंदेचा धक्का, 3 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश