Ramdas Athawale | ‘…म्हणून अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही’; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Athawale | महाराष्ट्रातील राजकारणाला प्रचंड वेग आला असून सध्या एका पाठोपाठ एक शिवसेनेचे आमदार शिंदे गटात सामील होताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेला आणखी बळ मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात सत्ताबदल होण्याच्या हालचाली होत आहेत. या घडामोडींवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी सांगलीत (Sangli) माध्यमांशी संवाद साधला.

 

“महाविकास आघाडी अनैसर्गिक होती. बंडाळीमुळे सेनेतील असंतोष बाहेर पडला आहे. महाविकास आघाडीचा विकासाचा अजेंडा नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 हून अधिक आमदार बंडामध्ये सहभागी झाले.” असं रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले” तसेच, “राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तोंड काळे झाले आहे. सेनेच्या बहुसंख्य आमदारांचे मत भाजपासोबत युती करण्याचे होते. मात्र संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची दिशाभूल केली असल्याचं ते म्हणाले.

 

“महाराष्ट्रातील परिस्थिती सध्या अस्थिर आहे, शिंदे यांनी केलेले बंड शिवसेनेला हा जबरदस्त झटका आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लागला आहे. अजित पवारांसारखा एकनाथ शिंदेंचा हा प्रयोग फसणार नाही. कारण अजित पवारांनी (Ajit Pawar) फडणवीसांसोबत शपथ घेताना नियोजन केले नव्हते, त्यामुळे सरकार स्थापन करण्याचा त्यांचा प्रयोग फसला,” असं देखील आठवले यांनी म्हटलं आहे.

रामदास आठवले यांनी पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांच्या बंडावर कविता देखील केली आहे..

ज्यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या सत्तेचे बंद केलेले आहे धंदे;
त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार आहेत
बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे खंदे
आणि आता ते राहिले नाहीत अजिबात अंधे,
म्हणून आता आमच्या सोबत येत आहेत एकनाथ शिंदे.

 

Web Title :- Ramdas Athawale | ramdas athawale says eknath shinde rebel will be successful

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा