Ramdas Athawale | ‘उद्धव ठाकरेंसोबत राहून काही मिळणार नाही, त्यामुळे…’, रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना खुली ऑफर

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया Republican Party of India (आठवले) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेशाध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना भाजपसोबत (BJP) येण्याची खुली ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, त्यांना मी भाजपकडे घेऊन जातो. कारण उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) राहून काहीही मिळणार नाही, असं आठवले म्हणाले.

 

32 राज्यात रिपब्लिकन पक्ष (RPI) काम करत आहे. प्रत्येक राज्यात पक्ष वाढवण्याचं काम सुरु आहे. आपल्याला महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) संघर्ष करायचा आहे. आरपीआय ज्यांच्या बाजूने असतो, त्यांनाच सत्ता मिळते. प्रकाश आंबेडकर आमचे नेते आहेत. प्रकाश आंबेडकर सांगतात की वंचित आघाडी ज्यांच्याबरोबर असते, त्यांना सत्ता मिळते. वंचित आघाडी स्वत:च्या जीवावर निवडणूक लढते आणि पडते, असे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

 

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नादाला लागू नये. ते कसे आहेत, मला माहिती. त्यामुळे मी भाजपबरोबर आलो आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे महायुतीत आले, तर स्वागतच आहे. तसेच महिला, दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळालं पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

यावेळी रामदास आठवले यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं. काही कार्यकर्त्यांमुळे पक्षाचा सत्यानाश होत आहे.
नुसते फोटो काढून, गर्दी करुन आणि केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांमुळे पक्ष वाढणार नाही.
नुसती फोकसगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला जाईल,
असं म्हणत रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले.

 

Web Title :  Ramdas Athawale | Shivsena Uddhav Thackeray VBA Prakash Ambedkar RPI Ramdas Athawale Shirdi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा