संसदेत मोदी, सोनिया गांधी आणि राहूल ‘या’ मुद्यावर ‘एकत्र’, वाजवल्या एकाच वेळी ‘टाळया’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा सुरु झाल्यावर, नव्या सभापतीची निवड देखील करण्यात आली, ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर अनेक नेत्यांनी संसदेत भाषण दिले. त्यातील काही नेत्यांच्या भाषणाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील आपल्या वेगळ्या अंदाजात संसदेत भाषण दिले. त्यांनी कविता देखील म्हणल्या आणि असे काही बोलले की संसदेत हस्यकल्लोळ उठला. यात समोर आले ते पंतप्रधान मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी याच्या सह अनेक सदस्याचा समावेश होता.

यावेळी संवाद साधताना रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. ते म्हणाले की राहुल गांधीनी बरेच प्रयत्न केले, परंतू लोकशाहीत लोकांना जे वाटते त्यांचे सरकार बनते. जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा मी तुमच्या सोबत होतो, परंतू आता तुमची सत्ता नाही. निवडणूकी आधी काँग्रेसवाले म्हणत होते आमच्यात या, परंतू मी हवा कोणत्या दिशेचे वाहते हे ओळखले आणि हवा मोदीसोबत आहे हे कळाले.

केंद्रीय मंत्री म्हणाले, की बिल पास करण्यासाठी विपक्षांची गरज आहे. आमचे सरकार ५ वर्षापर्यंत चालेल. ५ वर्षानंतर देखील पुढील पाच वर्ष चालेल. आणि चालतच राहिलं. आम्ही चांगले काम नाही केले तर तुमचे सरकार येईल, परंतू आम्ही असे होऊ देणार नाही.

ते ओम बिर्लाला म्हणाले, की आपण जास्त हसत नाहीत, परंतू मी तुम्हाला हसवेल. असे असले तरी रामदास आठवले हे लोकसभेचे खासदार नाहीत, परंतू मंत्री असल्याने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख असल्याने त्यांनी लोकसभेत भाषण दिली.