Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्यासाठी प्रयत्नात आहेत. त्यांच्यात बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हातात हात घालून एकत्र लढणार, असे चित्र आहे. त्यावर केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत भीमशक्ती नाही, ती माझ्यासोबत आहे, असे रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले आहेत.

 

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. त्यामुळे सगळीकडे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याच्या चर्चा आहेत. मात्र, ती भीमशक्ती नसून, वंचितशक्ती आहे. भीमशक्ती माझ्यासोबत आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, असे यावेळी रामदास आठवले म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले तरी आमच्या राजकारणात काही फरक पडणार नाही, असेही आठवले म्हणाले.

 

2011 साली बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्याकडे शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
त्यावेळी मी आठ ते नऊ महिने महाराष्ट्रातील विविध साहित्यिक, विचारवंत आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती.
आणि आम्ही एकत्रदेखील आलो होतो. आम्हाला सर्वांनी एकत्र येण्याच्या सूचना केल्या होत्या, असेही आठवलेंनी यावेळी नमूद केले.

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आणि खासदार विनायक राऊत उपस्थित होते.
आगामी काळात जागांबाबत या बैठकीत चर्चा झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलात ही बैठक पार पडली.
या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, वंचित बहुजन आघाडीने आपल्या अटी आणि शर्तीवर युती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीसोबत युती झाल्यास किती जागा मिळतील आणि फक्त शिवसेना (ठाकरे गट)
सोबत युती झाल्यास किती जागा मिळतील, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

Web Title :- Ramdas Athawale | union minister of state ramdas athawale has reacted to the alliance between thackeray group and vanchit bahujan aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

Pune Railway News | वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील लोको पायलट गायब; दोन दिवसांपासून तपास सुरू

Pune Crime | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधींची फसवणूक; पुणे जिल्ह्यातील प्रकार