Ramdas Athawale | ‘राज ठाकरेंनी मंदिरात भोंगे लावावेत पण मशिदीवरील भोंगे…’ – रामदास आठवले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Athawale | राज्यात सध्या भोंग्यांवरून (Loudspeaker) राजकारण सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र याला सरकारमधील पक्षांनी विरोध दर्शवला आहे. अशातच यावर बोलताना केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन करू नये. हवं असल्यास राज ठाकरे मंदिरात भोंगे लावू शकतात मात्र मशिदींमधून भोंगे हटवण्याची मागणी त्यांनी करू नये. आपल्या देशात लोकशाही (Democracy) आहे. भारतातील मुस्लिम हे पुर्वी हिंदु होते त्यामुळे एकमेकांच्या धर्माचा आदर करावा. प्रत्येक पक्षाची मुस्लिम विंग आहे त्यामुळे भोंगे काढायला लावणं योग्य नसल्याचं रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला भोंगे आहेत तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंगे लावायचे तर लावा, भोंगे काढायला आमचा विरोध आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आहे. त्यांच्या झेंड्यांमध्ये अनेक रंग होते पण आता त्यांनी एकदम कठोर भूमिका घेतली आहे. मात्र या कठोर भूमिकेमुळे त्यांना कोणताही राजकीय फायदा होणार नाही, असंही आठवले म्हणाले. दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनीही जाहीरपणे इशारा दिला आहे.

दरम्यान, कोणत्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी कृती कुणी करू नये. अशी कृती कुणी केल्यास मग ती संघटना असो वा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होणार, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Ramdas Athawale | union minister ramdas athawale opposed raj thackeray over mosque loudspeaker issue said


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) ! सॅलरी लिमिट रू. 15,000 वरून वाढून रू. 21,000 करण्यावर सरकार करत आहे विचार; 75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा

Rain in Maharashtra | राज्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Pune Crime | गांजा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारासह 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 4 लाख 24 हजाराचा मुद्देमाल जप्त

Lathicharge On Protesters In Katraj Chowk Pune | कात्रज चौकात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांकडून सौम्य लाठीमार

Pune PMC Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा