‘या’ मतदार संघातून रामदास आठवले आगामी निवडणूक लढविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी निवडणूक दक्षिण मध्य मुंबईमधून लढविणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. युती झाल्यास शिवसेनेने हा मतदारसंघ माझ्यासाठी सोडावा या बदल्यात पालघर मतदारसंघ त्यांनी घ्यावा असे रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आगामी निवडणुकीबद्दल बोलताना म्हणाले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2d3937ea-cfa8-11e8-a159-9ff219b01c10′]

भाजप शिवसेना युती झाल्यास हा मतदारसंघ माझ्यासाठी सोडावा. परंतु युती झाली नाही तर भाजपकडून हा मतदारसंघ रिपांईला मिळण्यास काहीच अडचण नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपसोबत जाण्याचा निर्णय मी कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच घेतला असल्याचेही आठवले यांनी सांगितले.नवीन सर्किट हाउस येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी वरिल माहिती दिली.
रिपाइंकडून अल्पसंख्याकाना संधी दिली जाणार आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजतील गैरसमज दूर करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहे. रिपाइंकडे सर्व समाजाने येण्यासाठी या पुढील अधिक काम केले जाणार आहेत. वंचिताचा पक्ष तयार करण्याचा काही जण प्रयत्न करीत आहे. मात्र, ते वंचितांना वंचित करणारे आहेत. भारिप आणि एमआयएम चा भाजप ला काही फटका बसणार नाही. तर उलट अधिक फायदाच होणार असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.

मनोहर पर्रीकर एअर अॅम्ब्युलन्सनं गोव्यात, प्रकृती अद्यापही गंभीर 

[amazon_link asins=’B077Q44DKY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’369c05cc-cfa8-11e8-a445-f9e2ba3b427d’]

समाजातील प्रत्येक घटकाला विचारून भाजप सोबत गेलो आणि मंत्रीपद घेतले आहे. मी ज्याच्या सोबत गेलो आणि त्यांची सत्ता आली आहे.हे आजवरच्या इतिहासात तून समोर आहे.त्यामुळे पुन्हा मोदी सरकार येणार आहे. काही प्रमाणात पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहे.ही चांगली बाब आहे.तर आता सरकारने जीएसटीमध्ये पेट्रोल डिझेलमध्ये आणल्यास किमान ३० रुपयांनी दर कमी होतील. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा एनडीएच्या बैठकीत मांडणार आहे.मराठा समाजाची भावना लक्षात घेता कायदा करण्याची वेळ आली आहे.यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने भूमिका मांडावी.