‘तो’ गुच्छ पाहून भडकले पर्यावरण मंत्री ‘भाई’

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पीक विमा मदत केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे उपस्थित झाले. कार्यक्रम सुरु झाला. त्यावेळी मंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठा पुष्पगुच्छ समोर आला. आणि ते पुष्पगुच्छ पाहून रामदास कदम भडकले. कारण, तो पुष्पगुच्छ तयार करण्यासाठी प्लॉस्टिकचा वापर करण्यात आला होता. त्यांनी प्रश्नांचा भडिमार सुरु केल्याने तहसीलदारांना निरुत्तर होण्याची वेळ आली.

शिवसेनेच्या वतीने शनिवारी सेलू येथे शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पर्यावरणमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे उपस्थित झाले होते. त्यावेळी हा प्रसंग घडला.

स्वागतासाठी आणलेले पुष्पगुच्छ पाहताच पर्यावरणमंत्री कदम यांचा पारा चढला. त्यांनी उपस्थित तहसीलदार बालाजी शेवाळे यांना धारेवर धरत राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. पर्यावरणासाठी आम्ही एवढे काम करीत असताना तुम्ही प्लास्टिकचा वापर करताय, हे प्लास्टिक येते कोठून? प्रमुख अधिकारी म्हणून तुम्ही कारवाई का करत नाहीत? तुम्ही काय करता, अशा अनेक प्रश्नांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे तहसीलदार शेवाळे हे निरुत्तर झाले.

आरोग्यविषयक वृत्त –

सावधान ! मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकतो ‘ब्रेन कँन्सर’

पांढरे केस काळे करा, मध आणि लसूण आहे रामबाण औषध

महिलांनो, आकस्मिक गर्भपात झाल्यास अशी घ्या काळजी

सावधान ! पाय दुखणे हा असू शकतो हार्ट अ‍ॅटॅकचा संकेत