
Ramdas Kadam On Aaditya Thackeray | ‘मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही’, कदमांच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले…
मुंबई : Ramdas Kadam On Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे यांच्यावर मी बोलणे योग्य होणार नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यावर बोलेन. मी बोलावे इतकी आदित्यची उंची नाही. आदित्य आणि त्यांचा बाप आमदार, खासदार, मंत्री, सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेटही घेत नव्हते. परंतु, आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना असे कामाला लावले आहे की बापही पळतोय आणि बेटाही पळतोय, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी केली होती. या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी उत्तर दिले आहे. (Ramdas Kadam On Aaditya Thackeray)
एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत म्हणाले, रामदास कदम यांच्यासह शिवसेना सोडून गेलेले आमदार निवडणुकीला उभे राहतील तेव्हा कोणाची उंची कळेल. जे विधानसभा सदस्य पळून गेलेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, निवडणुकीला उभे राहावे. तेव्हा कोण किती उंचीचे ते समजेल. (Ramdas Kadam On Aaditya Thackeray)
राऊत म्हणाले, रामदास कदम आमचे एकेकाळचे जुने सहकारी आहेत. ते ज्या भाषेत बोलतात त्या भाषेत मी बोलणार नाही.
त्यांचे आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. सहकारी, मित्र म्हणून एकत्र अनेक वर्ष काम केले.
त्यांनी त्यांचा वेगळा मार्ग स्वीकारला. ते चुकीच्या मार्गाने गेले. त्यांची कारणे त्यांच्यापाशी.
पण शिवसैनिक आणि जनता ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठीशी आहे.
येत्या निवडणुकीत कोकणात हे चित्र दिसेल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट