Ramdas Kadam | रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीने घेतले ताब्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. इडीच्या एका पथकाने आज पहाटे ही कारवाई केली. सदानंद कदम हे एक उद्योजक असून दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. (Ramdas Kadam)

गेल्या अनेक दिवसांपासून दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. दापोलीतील वादग्रस्त असलेल्या साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम सोबत ठाकरे गटातील वकील अनिल परब यांचा देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याच्या संशयावरून हि चौकशी सुरु आहे. (Ramdas Kadam)

काल खेड येथील एका खाजगी रुग्णालयात सदानंद कदम यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर लगेचच त्यांना आज पहाटे ईडीने ताब्यात घेतल्याने हा सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

Web Title : Ramdas Kadam | sadanand kadam arrested by ed action in sai resort case at ratnagiri

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Caste Issue | खत खरेदी करताना शेतकऱ्यांना जात विचारली? राज्य सरकारने केला खुलासा

Maharashtra Budget Session | सांगलीतील ‘जात’ प्रकारावरुन विधानसभेत खडाजंगी, मविआच्या आक्रमक नेत्यांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला

Pune PMC Warje Multispeciality Hospital | वारजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल : ठेकेदारासाठी महापालिकेने कर्ज काढण्यास आमचा विरोध – खासदार सुप्रिया सुळे