Ramdas Kadam | शिवसेना आमदार रामदास कदम यांना आणखी एक ‘झटका’; जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Kadam | शिवसेना नेते (Shiv Sena) आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माहिती पुरवल्याच्या आरोपांमुळे शिवसेना नेते रामदास कदम हे चांगलेच अडचणीत सापडलेले आहेत. कदम यांना आणिखी एक धक्का देण्याचं शिवसेना नेतृत्वानं ठरवलं असल्याचे समजते. त्याचबरोबर, रामदास कदम (Ramdas Kadam) यांना पुन्हा आमदारकी पदाची संधी दिली जाणार नसल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत. यांच्या आमदारकी पदाची मुदत 2021 मध्ये पहिल्या महिन्यात संपणार आहे. पंरतु कदम यांना पुन्हा आमदारकीची संधी दिली जाणार नाही. असं सुत्राकडून सांगण्यात येत आहे. रामदास कदम यांच्या जागी आणखी कोणाला तरी संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे आगामी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर नवा चेहरा विधान परिषदेला दिला जाणार असल्याचं समजते.

दरम्यान, रामदास कदम (Ramdas Kadam) हे फडणवीस सरकारच्या काळात पर्यावरण मंत्रीपद भुषवलं आहे. त्याचबरोबर कदम हे विरोधी पक्ष देखील राहिले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेतील एक आक्रमक नेते म्हणून ते ओळखले जातात. पंरतु मंत्रीपद न दिल्यानं ते अधिक नाराज आहे. असं सांगण्यात येत आहे. यातुनच त्यांनी परब यांच्या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. मनसेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी तसा जाहीर आरोप केला होता.

या दरम्यान, कदम व आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे (Prasad Karve) यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या.
म्हणून कदम यांच्यावरील संशय बळावला होता.
या संपूर्ण घटनाक्रमामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमालीचे नाराज आहेत.
त्यांची नाराजी आणि शिवसैनिकांचा संताप टाळण्यासाठी रामदास कदम हे यंदाच्या दसरा मेळाव्याला हजर नव्हते.
तसेच विशेष म्हणजे, आमदारकी नाकारून त्यांच्यासह पक्षातील अनेकांना योग्य तो संदेश देण्याचं पक्ष नेतृत्वानं ठरवल्याचं म्हटलं जात आहे.

हे देखील वाचा

Rakesh Jhunjhunwala | कमाईची सुर्वणसंधी ! SEBI ने 6 कंपन्यांच्या IPO ला दिली मंजूरी, जमवणार 12 हजार कोटी रुपये

Pune News | भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागू नये, फटका बसेल – रामदास आठवले (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  ramdas kadam | shiv sena may drop mla ramdas kadam as mlc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update