Ramdas Kadam | वादग्रस्त विधान करण्याची शिंदे गटातील नेत्यांमध्ये स्पर्धा, अब्दुल सत्तारांनतर रामदास कदम यांची जीभ घसरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाची पातळी (Maharashtra Politics) घसरल्याचे पहायला मिळत आहे. राजयकीय नेत्यांकडून अर्वाच्य भाषेचा वापर वाढला आहे. शिवराळ भाषा वापरण्यात शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यावर टीका करताना अर्वाच्य भाषा वापरली. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला आहे. ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर टीका करताना रामदास कदम (Ramdas Kadam) यांची जीभ घसरली.

अनिल परब यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात (Dapoli Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाल्यानंतर रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज रत्नागिरीतील खेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी अनिल परब यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना कदम यांनी अनिल परब यांच्यावर सडकून टीका केली. त्यावेळी त्यांची जीभ घसरली.

काय म्हणाले रामदास कदम?

अनिल परब यांनी शिवसेना (Shivsena) संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोडी-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला (Yogesh Kadam) परब यांनी खूप त्रास दिला असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील आपल्या भोवती असेच XXX लागतात अशा अर्वाच्च भाषेत कदम यांनी टीका केली. कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्यावरही टीका केली.
देसाई हे उद्धव यांचे कान चावतात, त्यांचे कान भरत असल्याचे कदम यांनी म्हटले.

रामदास कदम यांचे विरोधकांना आव्हान

शिंदे गटावर विरोधकांकडून ’50 खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या जात आहेत.
यावर बोलताना कदम म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे खोके देतात.
पण ते जनतेच्या विकासकामांसाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा ‘बाप दाखव नाही तर, श्राद्ध घाल’, असे आव्हानही त्यांनी दिले.
गुवाहाटीला गेलेले सर्व आमदार मी परत आणत होतो.
पण राष्ट्रवादीची साथ सोडा एवढीच मगाणी या आमदारांनी केली होती.
पक्ष फुटला तरी चालेल पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची (Congress) साथ सोडणार नाही
ही उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला.

Web Title :-  Ramdas Kadam | shivsena eknath shinde faction leader ramdas kadam using abusive word for anil parab at khed ratnagiri press conference

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त विधानावरुन राजकीय वातावरण तापलं, राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; केली ‘ही’ मागणी

Devendra Fadnavis | ‘अब्दुल सत्तार जे बोलले त्याचं मी समर्थन करणार नाही, ते चुकच आहे, पण…’, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडिओ)

Bank Interest Rate Hike | HDFC पाठोपाठ ‘या’ बँकेनेही वाढवले व्याजदर, नवे व्याजदर लागू: EMI ही वाढणार