Ramdas Kadam | रामदास कदमांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे आजारी, अजितदादांनी डाव साधला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ramdas Kadam | राज्यातील सत्तानाट्याचा पेच संपताना दिसत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक आमदार, खासदार, पदाधिकारी शिंदे गटात सामिल होत आहेत. नुकतच रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी मंत्रालयातील कारभार आणि सत्तेत असतानाचे निधीवाटपाचे घोळ यावर देखील त्यांनी संताप व्यक्त केला आहे. रामदास कदम यांनी अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप केले आहेत.

 

त्यावेळी बोलताना रामदास कदम (Ramdas Kadam) म्हणाले की, ”उद्धव ठाकरेंची तब्येत बरी नव्हती तेव्हा ते मंत्रालयात जात नव्हते. अजित पवारांनी याचा फायदा घेऊन आपला डाव साधला जिथे जिथे शिवसेनेचे आमदार आहेत तिथे त्यांचा आमदार जो पडलेला आहे, माजी आमदार त्याला फंडा द्यायचा. शिवसेना संपवण्याचा त्यांचा डाव आहे.”

 

पुढे रामदास कदम म्हणाले, “अजित पवारांना प्रशासकीय अनुभव चांगला असल्याने त्यांनी बरोबर डाव साधला. आज एक गोष्ट मी दाव्याने सांगत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि 51 आमदारांनी बंडखोरीचं हे पाऊल उचललं नसतं तर पुढच्या वेळी विधानसभेला शिवसेनेचे दहा आमदारही निवडून आले नसते. मी अभ्यास केला आहे सगळ्या गोष्टींचा.” असं ते म्हणाले.

 

“पालघरच्या सरपंचाला पाच कोटी दिले आहेत. एका एका सरपंचाला 5 कोटी रुपये दिले आहेत.
यादी देतो मी. अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी खजिना लुटला आहे.
निधी वाटपात त्यांनी योग्य डाव साधला आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात न येण्यामुळे हे सगळं सुरू राहिलं.
”पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत?,” असं कदम म्हणाले.

 

Web Title :- Ramdas Kadam | shivsena former leader ramdas kadam serious charge against ncp leader ajit pawar maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramdas Kadam | ‘शरद पवारांनी डाव साधला, पक्ष फोडला’ ! शिवसेना पत्त्यासारखी कोसळतेय, झोप लागत नाही, जेवण जात नाही’ – रामदास कदम

 

Shivsena MP Sanjay Raut | ‘आमदार, खासदार गेले तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही’ – संजय राऊत

 

Anti Corruption Bureau (ACB) Sangli | 25 हजाराची लाच प्रकरणी 2 पोलीस एसीबीच्या जाळ्यात; सांगली पोलिस दलात खळबळ