Ramdas Kadam | मुंबईतील एकूण शौचालयातून जेवढी घाण निघत नाही तेवढी…, शिवसेना नेत्याची रामदास कदमांवर जहरी टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नेते भास्कर जाधव (Shivsena Leader Bhaskar Jadhav) यांनी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर जहरी टीका केली आहे. रामदास कदमांची सभा राजकीय वैचारिक बैठकीला छेद देणारी सभा होती. मुंबईतील एकूण शौचाल्यातून जेवढी घाण निघत नाही तेवढी घाण एकट्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या तोंडातून पडली, अशी जहरी टीका भास्कर जाधव यांनी कदम यांच्यावर केली.

तातडीने वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे

भास्कर जाधव आणि त्यांची पत्नी माझ्या पाया पडले, असं रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले होते. यावरुन भास्कर जाधव यांनी रामदास कदमांची वैचारिक पातळी काढली आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर रामदास कदम, सुनील तटकरे (Sunil Tatkare), अनंत गिते (Anant Geete), हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) आले. समवयस्क मंडळी असलेल्या सर्वांच्या आम्ही सपत्नीक पाया पडलो. मात्र, कदम याचा अर्थ राजकारणाशी जोडत आहेत. त्यांना तातडीने वेड्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे, असं भास्कर जाधव म्हणाले.

तर मी राजकीय संन्यास घेतो अन्यथा…

कालच्या सभेमुळे रामदास कदम यांनी स्वत:सह स्वत:च्या मुलाच्या राजकीय भविष्याची माती केली आहे.
मी पक्ष सोडल्यावर कधीही कोणावर वैयक्तिक टीका केली नाही. रामदास कदम यांना महाराष्ट्र विसरला आहे.
मी MIDC मधून हप्ते घेतो हे एकदा संबंधित माणसाला समोर आणून सिद्ध करा.
तुम्ही सिद्ध केलं, तर मी राजकीय संन्यास घेतो अन्यथा तुम्ही तुमच्या मुलासोबत राजकारण सोडा, असं आव्हान भास्कर जाधवांनी रामदास कदमांना दिले आहे.

Web Title :-Ramdas Kadam | shivsena leader bhaskar jadhav criticizes ramdas kadam over his statement about uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MNS Chief Raj Thackeray | ‘होय… माझ्याकडून दुर्लक्ष झालं, पण यापुढे…’, राज ठाकरेंकडून नागपूरची कार्यकारिणी बरखास्त

Sushilkumar Shinde | कारस्थान करुन मला मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला घरचा आहेर

Shivsena MLA Nitin Deshmukh | ‘…तर मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन’, नितीन देशमुखांचा शिंदे गटाला थेट इशारा